धक्कादायक! औरंगाबादच्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने गळफास घेऊन केली आत्महत्या, शहरात खळबळ
Aurangabad News: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल माधवराव आग्रहाकर यांनी आत्महत्या करत जीवन संपवल्याचं समोर आले आहे. आग्रहाकर यांनी उल्कानगरी येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
अनिल आग्रहाकर हे औरंगाबादमध्ये यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहे. तर शहरात त्यांचे अनेक ठिकाणी गृहप्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्प सुरू आहेत. त्यांनी आत्महत्यासारखं टोकाचे पाऊल उचलल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तर आग्रहाकर यांनी धमकीच्या कॉलमुळे आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अजून कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पोलिसांची घटनास्थळी धाव...
अनिल आग्रहाकर यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तर पोलिसांनी आत्महत्यास्थळी पाहणी करत पंचनामा केला आहे. तसेच अनिल यांचा मृतदेह उत्तरतपासणीसाठी औरंगाबादच्या शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मात्र अनिल आग्रहाकर यांनी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल का उचलेले याचा खुलासा होऊ शकला नसून, पोलिसांकडून तपास सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! NIA-ATS कडून औरंगाबादसह परभणीत छापेमारी;पॉप्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात
Crime: आरोपी शोधण्यासाठी ठेवला खिचडी वाटपाचा कार्यक्रम, पण प्लॅन फसला; त्यानंतर पोलिसांनी चक्क...