Gram Panchayat Election: औरंगाबाद जिल्ह्यातील 14 सरपंच बिनविरोध, 308 सदस्यांचीही लागली लॉटरी
Gram Panchayat Election: उरलेल्या जागांसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे.
Gram Panchayat Election: राज्यात सात हजार पेक्षा अधिक मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) देखील एकूण 216 ठिकाणी निवडणूक (Election) पार पडणार आहे. मात्र मतदान होण्यापूर्वी 14 सरपंचांची बिनविरोध निवड झाली असून, 308 सदस्यांचीही लॉटरी लागली आहे. तर उरलेल्या जागांसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे.
जिल्ह्यात मुदत संपलेल्या 216 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत थेट सरपंचपदासाठी 1092,तर सदस्यपदासाठी 5481 अशा 6573 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांपैकी 371 जणांचे अर्ज छाननीत बाद ठरले. तर 1900 जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने सध्या सरपंचपदासाठी 611 तर सदस्यासाठी 3626 असे 4237 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. दरम्यान, यात थेट सरपंचपदी 14 तर सदस्यपदी 308 उमेदवारांच्या विरोधात एकही उमेदवार रिंगणात शिल्लक नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीची आकडेवारी
तालुका | सरपंच पदाचे उमेदवार | सदस्य पदाचे उमेदवार | बिनविरोध सरपंच | बिनविरोध सदस्य |
औरंगाबाद | 100 | 577 | 02 | 61 |
पैठण | 60 | 472 | 00 | 09 |
फुलंब्री | 49 | 321 | 03 | 21 |
सिल्लोड | 54 | 352 | 00 | 15 |
सोयगाव | 11 | 26 | 01 | 26 |
कन्नड | 140 | 833 | 03 | 63 |
खुलताबाद | 29 | 200 | 01 | 12 |
वैजापूर | 79 | 382 | 01 | 46 |
गंगापूर | 89 | 463 | 03 | 55 |
एकूण | 611 | 3626 | 14 | 308 |
राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
ग्रामीण भागात सद्या निवडणूकीचा उत्साहा पाहायला मिळत आहे. इच्छुकांकडून प्रचार सुरु आहे. तर निवडणुकीत आपलाच विजय होणार असे दावे केले जात आहे. सद्या गावातील पारावर सद्या फक्त निवडणुकीच्याच चर्चा रंगताना पाहायाला मिळत आहे. तर अनेक ग्रामपंचायतसाठी राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे.
Aurangabad : मॉल्सच्या पार्किंगमध्ये दुचाकी 'पार्क' करत असाल तर काळजी घ्या, बसू शकतो मोठा फटका