एक्स्प्लोर

Aurangabad: अंगावर शहारे आणणारी घटना! प्रेम प्रकरणातून प्रेयसीला कायमचं संपवलं

Aurangabad Crime news: हत्या केल्यानंतर सौरभ स्वतः देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात हजर झाला.

Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका युट्यूब पत्रकाराने तरुणीची गळा चिरून हत्या केली आहे. शहरातील हडको कॉर्नरजवळील डिमार्ट जवळ एका खोलीत तरुणीचा खून करून मृतदेह घेऊन जात असतांना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचे बोलले जात आहे. अंकिता श्रीवास्तव असे मृत महिलेचा नाव असून, सौरभ लाखे असे आरोपीचे नाव आहे. 

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सौरभ आणि अंकिता यांचे प्रेमप्रकरण होते. सौरभ हा औरंगाबादच्या शिऊर गावात राहायचा. तसेच तो एका युट्यूब चैनलला पत्रकार म्हणून काम करायचा. दरम्यान मयत मुलगी अंकिता जालना जिल्ह्यातून एमपीएससी-यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी औरंगाबाद मध्ये आलेली होती. याच काळात सौरभ आणि अंकिता यांच्यात प्रेम झाले. अंकिता राहत असलेल्या रूमवर सौरभचं नेहमी येणे-जाणे होते. 

तीन दिवसांपूर्वी केला खून...

सौरभ हा तीन दिवसांपूर्वी अंकिताच्या रूमवर आला होता. त्यावेळीच त्याने खून केला असल्याचा संशय आहे. कारण गेली तीन दिवस या रूमला बाहेरून कुलूप लावलेला होता. आज सकाळी सौरभ पुन्हा परत आला आणि दरवाजा उघडून मृतदेह पोत्यात भरून चारचाकी गाडीत टाकून निघून गेला. मात्र याचवेळी त्याने घराचा दरवाजा उघडाच ठेवला होता. त्यामुळे घरातून वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी जाऊन पाहिले असतांना त्यांना रक्ताचा सडा पाहायला मिळाला. त्यामुळे नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. 

पोलिसात जमा झाला...

एकीकडे पोलीस हत्या झालेल्या घटनास्थळी पोहचले होते. तर दुसरीकडे हत्या करणारा सौरभ चारचाकीत मृतदेह घेऊन ग्रामीण पोलिसांच्या देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात जाऊन पोहचला होता. तसेच आपण हत्या केली असून, मृतदेह गाडीत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. याचवेळी त्याने मी खून केला असल्याची माहिती पत्रकार आणि पोलिसांच्या ग्रुपवर टाकली. त्यांनतर आपण देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात जमा होत असल्याची माहिती सुद्धा ग्रुपवर टाकली. 
 
शहर पोलिसांनी घेतलं ताब्यात...

सौरभ याने हत्या केलेलं घटनास्थळ हे औरंगाबाद शहर पोलिसांच्या हद्दीत येते. तर आरोपी ज्या पोलीस ठाण्यात जाऊन जमा झाला आहे तो ग्रामीण हद्दीत येते. त्यामुळे औरंगाबाद शहर पोलिसांचं एक पथक देवगाव पोलिस ठाण्याकडे निघाले आहे. त्यानंतर आरोपी आणि मृतदेह पोलीस ताब्यात घेतील. तसेच मृतदेह घाटी रुग्णालयात उत्तर तपासणीसाठी नेण्यात येईल. 

शेजारी राहत असतांना झालं प्रेम...

अंकिताला एक मुलगा असून आपल्या पतीसोबत ती आधी शिऊरमध्ये सौरभच्या शेजारीच राहत होती. दरम्यान दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध निर्माण झाले. त्यानंतर अंकिताने नवऱ्याला सोडून औरंगाबाद शहरातील हडको कॉर्नरजवळल एक रूम भाड्याने घेतली.  तर सौरभ तिला सर्व आर्थिक मदत पुरवत होता. तसेच तिच्या घरी त्याचं नेहमी येणेजाणे होते. दरम्यान अंकिताने लग्नासाठी सौरभच्या मागे तकादा लावला होता. त्यामुळेच अखेर त्याने तिची हत्या केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
Prakash Mahajan on Prithviraj Chavan: सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल
सोनिया गांधींची परवानगी असताना मनमोहन सिंग यांच्यात नाही म्हणण्याची क्षमता होती का?; प्रकाश महाजनांचा पृथ्वीराज चव्हाणांना थेट सवाल
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका
'शिंदे-फडणवीस पागल समजता का? पुन्हा भानगडी करू नका, तुम्हाला राजकारणातून संपवू'; मनोज जरांगे पाटलांची घणाघाती टीका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget