(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या संस्थेतील 10 ते 12 जणांचे नावं टीईटी घोटाळ्यात; दानवेंचा आरोप
Aurangabad: टीईटी घोटाळ्यासंबधी सत्तार यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नावं समोर आल्यावर सुद्धा त्यांना मंत्रिपदावर कसे ठेवण्यात येत आहे: अंबादास दानवे
Aurangabad News: राज्यात गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलींचे नावं समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता त्यांच्या शैक्षणिक संस्थेतीही 10 ते 12 जणांचे नावं टीईटी घोटाळ्यात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. तर टीईटी घोटाळ्यासंबधी सत्तार यांच्या कुटुंबातील सदस्यांचे नावं समोर आल्यावर सुद्धा त्यांना मंत्रिपदावर कसे ठेवण्यात येत आहे, असा प्रश्न सुद्धा दानवे यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, टीईटी घोटाळ्यात मंत्री आहेत की, नाही हे तपासावे. तोपर्यंत यांना मंत्री पदावर ठेऊ नये. तर मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संस्थेतील 10-12 जणांचे नावे टीईटी घोटाळ्यात आहेत. हे सर्व सरकार उघडया डोळ्यांने का बघतय असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. विधीमंडळाच्या अधिवेशनात आम्ही टीईटी घोटाळ्याचा विषय बारकाईने मांडला होता. त्यावर चौकशी सुरू झाली. पण ही चौकशी संशयास्पद दिसतेय असा आरोपही दानवे यांनी केला.
दसरा मेळावा होणारचं...
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अजूनही मुंबई महानगरपालिकेनी परवानगी दिली नाही. यावर बोलतांना दानवे म्हणाले की, मेळावा सगळे घेऊ शकतात, मात्र शिवसेनेचा मेळावा ही संस्कृती आहे परंपरा आहे. शिवाजी पार्क मिळेल हा मुद्दा नाही ते आम्हालाच मिळेल यात शंका नाही. आमचा मेळावा दिमाखात थाटात होईल,असा दावा दानवे यांनी केला.
इगो पूर्ण करण्यासाठी फडणवीसांची धडपड...
मुंबई मेट्रो-3 ची (Mumbai Metro-3 Trial Run) चाचणी आजपासून सुरू करण्यात आली आहे. यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई मेट्रो-3 चे काम फक्त इगोमुळे मेट्रो थांबले होते. त्यांच्या याच आरोपाला उत्तर देतांना अंबादास दानवे म्हणाले की, आमची भूमिका जंगल, आदिवासी वाचावे अशीच आहे. महाराष्ट्रात अजून शेतकऱ्यांना मदत नाही, मात्र बुलेट ट्रेन सुरू करायला मात्र धडपड सुरु आहे. त्यामुळे इगो त्यांचाच आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड सुरु असल्याचा टोला दानवे यांनी फडणवीस यांना लगावला आहे.
शिरसाट यांची नाराजी उघडपणे आहे...
शिंदे गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यात आमदार संजय शिरसाट नाराज असल्याचा प्रश्नाला उत्तर देतांना दानवे म्हणाले की, संजय शिरसाठ लपूनछपून अस्वस्थ नाहीत तर उघड-उघड अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रमाणे आणखी अनेकजण अस्वस्थ असतील असेही दानवे म्हणाले.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI