Marathwada: मराठवाड्यात 66 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भरला पीक विमा; 35 लाख हेक्टरला विमा कवच
Aurangabad News: सर्वाधिक बीड जिल्ह्यातील 16 लाख 48 हजार 798 शेतकऱ्यांनी विमा भरत पिके संरक्षित केले आहे.
Marathwada Farmer News: कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील 66 लाख 30 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. पीक विमा भरण्याची तारीख संपल्यानंतर आलेल्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी एकूण 389.45 कोटी रुपयांचा भरणा करत, 35.21 लाख हेक्टरवर पिकाला विमा कवच दिलं आहे. ज्यात सर्वाधिक बीड जिल्ह्यातील 16 लाख 48 हजार 798 शेतकऱ्यांनी विमा भरत पिके संरक्षित केले आहे.
अ.क्र. | जिल्हा | शेतकरी | किती हेक्टरसाठी |
1 | औरंगाबाद | 7,28,130 | 3,11,870 |
2 | जालना | 7,42,770 | 3,17,765 |
3 | बीड | 16,48,798 | 6,27,416 |
4 | लातूर | 7,37,816 | 5,01,174 |
5 | उस्मानाबाद | 6,68,103 | 5,01,714 |
6 | नांदेड | 10,59,590 | 6,23,656 |
7 | परभणी | 6,65,046 | 4,21,312 |
8 | हिंगोली | 3,80,421 | 2,16,041 |
मराठवाड्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान...
मराठवाड्यात 6 लाख 27 हजार 614 शेतकऱ्यांना यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे फटका बसला आहे. तर 4 लाख 38 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहे. त्यांनतर शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शेतकरी पीक विमा सुद्धा भरत असून, त्यातून सुद्धा काही नुकसानभरपाई मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
महत्वाच्या बातम्या...
Thackeray vs Shinde Case LIVE : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता 8 ऑगस्ट रोजी सुनावणी, आजची सुनावणी संपली