Marathwada:पावसाच्या पुनरागमनाने मराठवाड्यातील पिकांना जीवनदान; पहा कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस
Marathwada Rain Update: गतवर्षीच्या तुलनेत मराठवाड्यात 3 टक्क्यांनी जास्त पाऊस पडला असून, धरणातील पाणीसाठा सुद्धा वाढण्याची शक्यता आहे.
Marathwada Rain Update: गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यात पडत असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळाले आहे. विशेष म्हणजे 1 जून ते 10 जुलैदरम्यान झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार आठही जिल्ह्यांतील पावसाने सरासरी ओलांडली आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत मराठवाड्यात 3 टक्क्यांनी जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे धरण साठ्यात सुद्धा वाढ होतांना पाहायला मिळत आहे.
जुलैच्या 10 दिवसातील पाऊस
जिल्हा | अपेक्षित पाऊस | प्रत्यक्ष पाऊस | टक्के |
औरंगाबाद | 49 | 74.3 | 151.3 |
जालना | 53.7 | 117.3 | 218.5 |
बीड | 41.2 | 76.7 | 186.2 |
लातूर | 60.3 | 92.2 | 152.9 |
उस्मानाबाद | 44.2 | 87.8 | 198.5 |
नांदेड | 78.8 | 217 | 275.4 |
परभणी | 70.7 | 124.7 | 176.4 |
हिंगोली | 74.3 | 190.4 | 256.4 |
एकूण | 60.1 | 124.8 | 207.7 |
जून महिनाच्या सुरवातीपासूनच पाठ फिरवणाऱ्या पावसाने जुलैमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट सद्यातरी टळले आहे. मात्र असे असताना मराठवाड्यातील 455 पैकी 10 मंडळांत अजूनही सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याच्या नोंद आहे. त्यामुळे याठिकाणी शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरम्यान दोन दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे आता धरणातील पाणीसाठा वाढतांना पाहायला मिळत आहे.
मराठवाड्यातील धरणातील पाणीसाठा
अ.क्र. | धरण | जलसाठा | टक्के |
1 | जायकवाडी | 71.32 | 34.63 |
2 | निम्न दुधना | 23.96 | 66.05 |
3 | येलदरी | 40.01 | 57.23 |
4 | सिद्धेश्वर | 28.63 | 6.14 |
5 | माजलगाव | 25.58 | 33.14 |
6 | मांजरा | 1.32 | 27.47 |
7 | पैनगंगा | 74.09 | 53.98 |
8 | मानार | 26.42 | 52.85 |
9 | निम्न तेरणा | 1.88 | 50.89 |
10 | विष्णुपुरी | 87.80 | 60.68 |
11 | सीना कोळेगाव | 0.00 | 16.42 |