एक्स्प्लोर

Aurangabad : जेवण केल्यानंतर बिल देण्याची वेळ येताच घातला राडा, हॉटेल मालकावर केला जीवघेणा हल्ला

Aurangabad Crime News: मद्यपींनी बिअरच्या बाटल्या टेबलवर फोडून बिल देणार नाही, असे म्हणत गोंधळ घातला.

Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) झाल्टा शिवारातील एका हॉटेल मालकावर (Hotel Owner) केला जिवघेणा हल्ला (Attack) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बिल देण्यावरून आधी दोन मद्यपींनी वेटर व हॉटेल मालकांसोबत भांडण केले. त्यानंतर 14 जणांच्या टोळक्याने हॉटेल मालकांसह त्याच्या काकांवर चाकू, स्टंप, बॅट, रॉडने जीवघेणा हल्ला केला. यात दोघे गंभीर जखमी झाले. हा प्रकार झाल्टा शिवारातील हॉटेल आकाश परमिट रूम व बारवर घडला आहे. तर या प्रकरणी चिकलठाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर रामेश्वर शिंदे आणि छत्रपती रामचंद्र शिंदे (दोघे रा. झाल्टा, ता. औरंगाबाद) अशी जखमींची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झाल्टा शिवारातील गट क्र. 54 मध्ये सागर शिंदे यांचे हॉटेल आकाश बिअर बार नावाने हॉटेल आहे. आकाश यांच्यासह त्यांचे वडील देखील हॉटेल चालवितात. दरम्यान 8 जानेवारीला दुपारी दोन वाजता सागर घरी गेला होता. तेव्हा त्याचे वडील रामेश्वर, वेटर अजयसिंग गुलाबसिंग चव्हाण आणि गावातील विलास शिंदे हे तिघे हॉटेलवर होते. मात्र अंदाजे अडीच वाजता वेटर चव्हाणचा सागर यांना फोन आला. हॉटेलमध्ये दोघे अनोळखी दारू पिलेले असून, बिलावरून भांडत असल्याचे सांगितले. त्यानंतर सागर तत्काळ हॉटेलमध्ये गेला. त्यानंतरही त्या मद्यपींनी बिअरच्या बाटल्या टेबलवर फोडून बिल देणार नाही, असे म्हणत गोंधळ घातला. खाल्ल्यापिल्यानंतर बिल देण्याची वेळ येताच या मद्यपींनी राडा घातला होता. 

अचानक आलेल्या टोळक्याने केली मारहाण...

सागरने मध्यस्थी करत त्यांची समजूत घातल्यावर ते तेथून निघून गेले. पण काही वेळातच वेगवेगळ्या दुचाकीवरून तब्बल 14  जणांचे टोळके हॉटेलवर आले. त्यांच्याकडे लाकडी दांडे, बॅट, स्टंप, लोखंडी रॉड व चाकू होते. त्यांनी आधी बाहेरील चारचाकी व दुचाकींची तोडफोड केली. त्यानंतर हॉटेलमध्ये घुसून सागर शिंदे व त्याचे चुलते छत्रपती शिंदे यांच्यावर जिवघेणा हल्ला केला. सागरच्या छातीत व दंडावर चाकूने वार केले. छत्रपती शिंदे यांच्या कमेरजवळ चाकू खुपसला, ज्यात ते जखमी झाले. त्यानंतर हे टोळकं तेथून निघून गेले. 

याबाबत माहिती मिळताच चिखलठाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दोन्ही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या:

Aurangabad News: 'आई मला माफ कर, आता जगण्यात अर्थ वाटत नाही'; सीए परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget