Aurangabad: शिवसेनेचा आमदार 'मृत कुटुंबा'ची सांत्वन करून आला; शिंदे गटाचा आमदार मदत घेऊन पोहचला
Aurangabad: शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या सांत्वन भेटीनंतर रमेश बोरणारे यांनी मृत कुटंबाची भेट घेतली.
Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात विद्युत प्रवाहाच्या तार ओढण्याचे काम करत असताना अचानक विद्युत तारेत प्रवाह आल्याने चार तरुणांचा मृत्यु झाला होता. त्यांनतर आज शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी या कुटुंबातील सदस्यांची सांत्वनपर भेट घेतली. तसेच शासनातर्फे होईल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यांच्या या भेटीनंतर काही तासात शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे सुद्धा मृत कुटंबाच्या घरी पोहचले. तसेच मुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांचे बोलणं करून देत रोख मदतही केली.
औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील हिवरखेडा नांदगीर वाडी येथे नवीन विद्युत प्रवाहाच्या तार ओढण्याचे काम करत असताना अचानक विद्युत तारेत प्रवाह आल्याने कन्नड तालुक्यातील नावडी येथील गणेश कारभारी थेटे (35) भारत बाबुराव वरकड (35) जगदीश मुरकुंडे( 40) अर्जुन वाळु मगर (26) यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान आज दानवे यांनी मृत तरुणांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच शासनातर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
बोरणारेंचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन...
दानवे यांच्या भेटीनंतर काही तासात शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारे यांनी मृत कुटंबाची भेट घेतली. तसेच यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे बोलणे करून दिले. तर मुख्यमंत्री यांनी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येक कुटुंबास पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच बोरणारे यांनी सुद्धा प्रत्येक कूटुंबास रोख स्वरुपात 50 हजार रुपये मदत करत सांत्वन केले. त्यामुळे या दोन्ही भेटीची परिसरात चर्चा पाहायला मिळाली.
महत्वाच्या बातम्या...
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिपदासाठी शिंदे गटात 'मारामाऱ्या' होतील; खैरेंचा खोचक टोला