एक्स्प्लोर

Aurangzeb Tomb Open: औरंगजेबाची कबर आजपासून पुन्हा खुली; मात्र पोलिसांचा बंदोबस्त कायम

राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असल्याने गेल्या आठवड्यात औरंगाबादमधील खुलताबाद येथील औरंगजेबाची पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेली कबर पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे.

Aurangzeb Tomb Open: औरंगाबादमधील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर गेल्या आठवड्यात पाच दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. औरंगजेब कबर समितीने मागणी केल्यानंतर पुरातत्व विभागाने हा निर्णय घेतला होता. त्यामुळे पर्यटकांना औरंगजेबाच्या कबरीवर जाण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र आता आजपासून पुन्हा एकदा औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आता कबरीवर जाता येणार आहे. 

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं वाहिली आणि त्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण तापलं.आरोप प्रत्यारोप झाले, कारवाईची मागणी करण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरुन महाराष्ट्रात राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.तर ही कबर कशाला असा प्रश्न मनसेने उपस्थित केल्यानंतर तिथला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले होते. बॅरिकेड्स देखील लावण्यात आले. त्यांनतर परिस्थिती पाहता ही कबर काही दिवसांसाठी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात यावी, अशी विनंती औरंगजेब कबर समितीने पुरातत्व विभागाला केली होती. म्हणून पाच दिवस कबर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

पोलिसांचा बंदोबस्त कायम राहणार! 

 मात्र पाच दिवसांनंतर ही कबर पुन्हा एकदा पर्यटकांसाठी सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी लावण्यात आलेला पोलिसांचा बंदोबस्त तसाच कायम असणार आहे. कबरच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले आहे. काही राजकीय पक्षांनी कबर उखडून फेकण्याची मागणी केली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलं आहे. 

औरंगजेबाची कबर इतिहास आणि राजकारण

बादशाह औरंगजेब..त्याचं पूर्ण नाव आहे अबू मुझफ्फर मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर..मुघल सम्राट औरंगजेब जरी या देशाचा स्रमाट राहून गेला असला तरी सुद्धा त्याची कारकीर्द वादग्रस्तच राहिली आहे. सत्तेसाठी स्वत:च्या कुटुंबियांना संपवणारा या सम्राटाची राजवट जुलमी होती, असंही इतिहासकार सांगतात. मात्र यासोबतच तो कमालीचा धार्मिक होता आणि याच धार्मिकतेतून त्याची समाधी औरंगाबादच्या खुलताबादमध्ये आहे. कारण मृत्युनंतर याच भूमीत पुरायचं अशी त्याची इच्छा होती आणि त्याचं कारण होतं, ते म्हणजे त्याचे गुरु शेख झैनुद्दीन. हे एक सुफी संत होते, त्यांचा खुलताबादमध्ये दर्गा आहे, खुलताबाद म्हणजे जन्नतला जाणारा मार्ग म्हणून याच दर्ग्यात अत्यंत साध्या पद्धतीने त्याचा दफनविधी झाला आणि त्याची अत्यंत साधी समाधी आहे. याच कबरीवर एमआयएम नेत्यांनी फुलं वाहिली आणि त्यातून राजकारण सुरु झालं. 

औरंगजेब म्हणजे मुस्लिमांचा मसिहा तर त्याने छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करुन मारलं होतं म्हणून तो हिंदूंसाठी क्रूरकर्मा. त्याच्या कबरीवर कुठलाही राजनेता गेला की वाद हा ठरलेलाच. आम्ही अल्ला समोर झुकतो औरंगजेबासमोर नाही असं कधी काळी म्हणणारे एमआयएम खासदार इम्तियाज जलील देखल समाधीवर फुलं वाहण्यात अग्रेसर होते आणि यामुळेच हिंदुत्ववादी पक्ष तर तुटून पडले. हिंदुत्ववादी पक्षाकडून आरोप होत आहे. मुस्लिमांची अस्मिता चेतवण्यासाठी एमआयएम औरंगजेबाच्या कबरीचा वापर करत आहे तर हिंदूंना आपल्याकडे ओढण्यासाठी इतर पक्ष आता औरंगबजेबाच्या इतिहासाचा वापर करत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Embed widget