एक्स्प्लोर
Aurangabad Partial Lockdown: औरंगाबाद जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन जाहीर
वाढत्या कोरोना केसेसमुळे औरंगाबाद जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्ह्यात 11 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत निर्बंध लादण्यात येणार आहे.
औरंगाबाद : वाढत्या कोरोना बाधित रुग्णसंख्येमुळे औरंगाबाद जिल्ह्यात 11 तारखेपासून अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. तर शनिवार आणि रविवार पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. हे निर्बंध 4 एप्रिलपर्यंत असणार असणार आहेत. शहरात लॉकडाऊन संदर्भात आज बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त, ग्रामीणच्या एसपी यांच्यामध्ये ही बैठक झाली.
काय आहेत निर्बंध?
- राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम, आंदोलन, स्विमिंग पूल, शाळा, महाविद्यालय बंद राहणार.
- या कालावधीत लग्न समारंभ होणार नाहीत.
- हॉटेल, बार रात्री 9 नंतर बंद राहणार. 9 पर्यंतही 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील.
- शनिवारी आणि रविवार शहरात पूर्ण लॉकडाऊन असेल.
- वैद्यकीय सेवा, फळ विक्रेते, गॅस उद्योग कारखाने, सुरू राहतील.
- किराणा सुरू राहणार, मात्र मॉल बंद.
- बुधवारपासून बाजार समिती बंद राहणार.
- ज्यांचं लग्न पूर्वीच ठरले आहेत, त्यांना रजिस्टर लग्न करण्याचा सल्ला.
- 11 मार्चपासून ते 4 एप्रिल सगळी पर्यटनस्थळ बंद, वेरूळ, अजिंठा, बिबीचा मकबराही बंद.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement