एक्स्प्लोर

अर्रर्रर्र... चोरांकडे टोल देण्यासाठी पाचशे रुपये नव्हते; कापसानं भरलेली 22 लाखांची आयशर गाडी सोडावी लागली

Aurangabad Crime: पोलिसांनी हा आयशर ताब्यात घेतला असून, चोरांचा देखील शोध घेतला जात आहे. 

Aurangabad Crime News: औरंगाबाद जिल्ह्यातील एका आगळ्यावेगळ्या चोरीची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एका पेट्रोल पंपावर कापसाने भरलेला आयशर ट्रक चोरांनी पळवून नेला. मात्र पुढे टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी पाचशे रुपये नसल्याने त्यांनी तिथेच वाद घालायला सुरुवात केली. दरम्यान, याचवेळी मागून गस्तीवरील पोलिसांचे वाहन आल्याचे पाहून, चोर आयशर ट्रक तिथेच सोडून पळाले. त्यानंतर पोलिसांनी हा आयशर ट्रक ताब्यात घेतला असून, चोरांचा देखील शोध घेतला जात आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथील राजेद्र तुकाराम दौड यांच्याकडे आयशर ट्रक (एमएच 21 बीएच 3024) आहे. दरम्यान, शनिवारी काही शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी नेण्यासाठी राजेद्र दौड यांच्या आयशरमध्ये जवळपास 7 लाख 66 हजार रुपये किमतीचा 95 क्विंटल कापूस भरला होता. दरम्यान, हा कापूस सिल्लोड येथील जिनिंगमध्ये विक्रीसाठी नेत असताना आयशर चालकाने गाडी औरंगाबाद जळगाव महामार्गावरील आदित्य पेट्रोल पंपावर रात्री 8 वाजेच्या सुमारास उभा केली होती. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी हा आयशर ट्रक पळवला. तर सकाळी जेव्हा चालक पेट्रोलपंपावर गेला त्यावेळी ही घटना समोर आली होती. त्यानंतर मालक तुकाराम दौड यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 

टोल नाक्यावर टोल देण्यासाठी पाचशे रुपये नव्हते

दरम्यान, चोरीची आयशर घेऊन निघालेले चोरटे कन्नड तालुक्यातील हतनूर टोल नाक्यावर पोहचले. मात्र यावेळी या चोरट्यांकडे पाचशे रुपये टोल देण्यास नव्हते. यावरून चोरटे आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांत वाद झाला सुरू झाला. पण याचवेळी पाठीमागून गस्तीवर असलेली कन्नड पोलिसांची गाडी आली. पोलिसांची गाडी येत असल्याचे पाहून चोरट्यांनी आयशर सोडून धूम ठोकली. त्यानंतर पोलिसांनी आयशर ताब्यात घेतला आहे. 

चोरांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान 

चोरीला गेलेल्या आयशरचा अजिंठा पोलिसांकडून शोध सुरु असतानाच तो कन्नडच्या हतनूर जवळ आलेल्या टोल नाक्यावर उभा असल्याची माहिती अजिंठा पोलिसांना मिळाली. त्यामुळे अजिंठा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन तो आयशर ताब्यात घेतला. तसेच चोरी गेलेल्या आयशरमधील कापूस देखील तसाच असल्याचे समोर आल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.मात्र आयशर चोरणारे चोरटे कोण होते त्यांचा शोध घेऊन अटक करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे. यासाठी टोल नाका आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Aurangabad: पिस्तूलचा धाक दाखवत कापूस व्यापाऱ्याचे 27 लाख रुपये लुटले; सोलापूर-धुळे महामार्गावरील घटना

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

 Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न, 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
जरांगे पाटील मागण्यांवर ठाम! संभाजीनगरमध्ये विखे पाटलांच्या उपस्थितीत मंत्र्यांची बैठक सुरु, तोडगा निघणार का? 
जरांगे पाटील मागण्यांवर ठाम! संभाजीनगरमध्ये विखे पाटलांच्या उपस्थितीत मंत्र्यांची बैठक सुरु, तोडगा निघणार का? 
Chhatrapati Sambhajinagar Crime : MHT-CET चा 4.5 लाख विद्यार्थ्यांचा डेटा 10 हजारात विकला; डेटा कुणाकडे पोहोचला? अन्... छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षकाचा खळबळजनक आरोप
MHT-CET चा 4.5 लाख विद्यार्थ्यांचा डेटा 10 हजारात विकला; डेटा कुणाकडे पोहोचला? अन्... छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षकाचा खळबळजनक आरोप
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 5 वा दिवस; विखे-पाटील-सामंतांची पत्रकार परिषदेतून माहिती, म्हणाले आम्ही मसुदा दिलाय
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 5 वा दिवस; विखे-पाटील-सामंतांची पत्रकार परिषदेतून माहिती, म्हणाले आम्ही मसुदा दिलाय

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Nagpur DJ BAN : महाराष्ट्राच्या उपराजधानीत डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
Embed widget