एक्स्प्लोर

कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांकडून कोणतंही व्याज वसूल न करता, पीककर्ज द्यावे : औरंगाबाद खंडपीठ

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक सरकारचे निर्देश डावलून खरीप पीक कर्ज वाटप करताना, आधीचं व्याज घेतात किंवा व्याज दिल्याशिवाय पीक कर्ज वाटप करत नाही, असा आरोप करत करत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कोणतंही व्याज वसूल न करता पीककर्ज देण्याचे निर्देश दिले आहेत.

औरंगाबाद : व्याजाची रक्कम वसूल न करता पीक कर्ज द्यावे, असे अंतरिम निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर जी अवचट यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी 20 जुलै रोजी होणार आहे.

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंर्गत कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्याकडून कोणत्याही स्वरुपात व्याजाची रक्कम वसूल करण्यात येऊ नये, तसेच कोणत्याही लाभार्थी शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज मिळण्यापासून वंचित ठेऊ नये, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारचे आहेत. तरीही औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक हे निर्देश डावलून शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटप करताना, आधीच्या कर्जाचे व्याज कापून घेतात किंवा व्याज दिल्याशिवाय पीक कर्ज वाटप करत नसल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी किशोर अशोकराव तांगडे या शेतकऱ्याने अॅड. सतीश बी. तळेकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली होती.

या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, "राज्यात ऑक्टोबर 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर 25 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या काळातील शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज आणि त्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय 27 डिसेंबर 2019 च्या शासना निर्णयाद्वारे घोषित केला. राज्यातील जवळपास 19 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार होता. त्यानंतर राज्य सरकारने हे कर्ज आणि त्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय 31 मार्च 2019 पासून 30 सप्टेंबर 2019 पर्यंत वाढवला. परंतु, कर्ज माफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्यासाठीची संगणकीय पोर्टल तयार करुन बँकांना उपलब्ध करुन देणे, बँकांमार्फत या पोर्टलमध्ये संबंधित शेतकऱ्यांची कर्जखात्याची माहिती अपलोड करणे, शेतकऱ्यांनी कर्जखात्यांना आधार क्रमांकाची जोडणी करणे, या कारणांमुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची लाभ देण्यास कालावधी लागणार असल्यामुळे 30 सप्टेंबर 2019 नंतर शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर व्याज आकारणी केल्यास संबंधित शेतकऱ्यांस कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतरही संबंधित शेतकऱ्यांचे कर्जखाते निरंक होणार नाही. योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामधील थकित रकमेवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी व्याजाची आकारणी करु नये असा निर्णय घेतला.

त्यानंतर, कोरोना विषाणूमुळे कर्ज फीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे पात्र शेतकऱ्यांना खरीप 2020 हंगामामध्ये नवीन पीक कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होतील, म्हणून सरकारने 22 मे 2020 च्या शासन निर्णयाद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर असलेली रक्कम 'शासनाकडून येणे दर्शवावी' आणि शेतकऱ्यांना खरिपासाठी पीककर्ज द्यावे. तसंच संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला असा निधी व्याजासहित सरकारकडून देण्यात येईल असे निर्देश दिले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik on Abu Azmi : फटीचर झालो तरी हात पसरत नाही,मलिक आझमींवर भडकलेAaditya Thackeray Bike Rally : प्रचाराचा शेवटचा दिवस, आदित्य ठाकरेंची भव्य बाईक रॅलीPratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलकVinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
Embed widget