एक्स्प्लोर

औरंगाबादमध्ये कोरोनामुळे आईचा मृत्यू, सात दिवसाचं बाळ आईविना पोरकं!

औरंगाबादमधील घाटीमध्ये प्रसुती झालेल्या महिलेचा कोरोना अहवाल 29 मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवलं. परंतु 4 जून रोजी दुपारी दोन वाजता या मातेचा मृत्यू झाल्यामुळे अवघ्या सात दिवसात बाळ आईविना पोरकं झालं.

औरंगाबाद : कोरोनामुळे राज्यात-देशात अनेक करुण कहाण्या आपण ऐकत आहोत, अनुभवत आहोत. त्यात आता आणखी एक दुर्दैवी घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. औरंगाबादेत कोरोनामुळे अवघ्या सात दिवसांत बाळ आईविना पोरकं झालं आहे. घाटी रुग्णालयात काल (4 जून) दुपारी दोन वाजता ही अत्यंत वेदनादायी घटना घडली.

शहरातील कटकट गेट भागातील 30 वर्षाची एक महिला 28 मे रोजी घाटी रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झाली. या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाचा पहिल्या दिवशीचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला. आई आणि डॉक्टरांसाठी ही आनंदाची बातमी होती. बाळ-बाळंतीण सुरक्षित होते. पण 29 मे रोजी या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. बाळ कोरोना मुक्त राहावं म्हणून आई आणि बाळाला वेगळे ठेवण्यात आले. बाळाला नवजात शिशू विभागात ठेवलं. आईचं दूध बाळापर्यंत पोहोचवण्यात येत होतं. पण एक-दोन दिवसात महिलेला अस्वस्थ वाटायला लागलं. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिल व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते, मात्र त्यांना या महिलेला वाचवण्यात त्यांना यश आलं नाही. त्या बाळाने आईचा चेहराही लक्षात राहिला नसेल, शिवाय आईलाही बाळाला डोळे भरुन पाहिलं नसेल. मात्र त्याआधीच नियतीने त्यांची कायमची ताटातूट केली आहे.

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात आतापर्यंत 22 कोरोना पॉझिटिव्ह महिलांनी बाळांना जन्म दिला आहे. या बाळांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काही काळ आई आणि बाळांना वेगळं ठेवलं गेलं. डॉक्टरांनी व्हिडीओ कॉल करुन आई आणि बाळांची भेट देखील घडून दिले दिली. उपचारानंतर यातील काही बाळं घरी जाऊन आपल्या आईच्या कुशीत सुरक्षित आहेत. बाळ आणि आई कोरोनातून सुरक्षित बरे झाल्यानंतर डॉक्टरांच्या सर्व टीमने त्यांना टाळ्या वाजवून निरोप दिला. कोरोनाशी लढा देऊन आई जेव्हा बाळाला कुशीत घेते तो क्षण आतापर्यंतच्या सेवेतील अंत्यत आनंदाचा होता, असं या विभागाच्या डॉक्टर मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितलं. मात्र कालचा क्षण हा अत्यंत वेदनादायी होता हेही त्या सांगायला विसरल्या नाहीत.

औरंगाबादेत कोरोनाची स्थिती कशी? औरंगाबाद जिल्ह्यात आज (5 जून) सकाळी 59 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये 19 महिला आणि 40 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे औरंगाबादेत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1828 वर पोहोचली आहे. यापैकी 1126 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनामुळे 93 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 609 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज

अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget