एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आंबेडकरी चळवळीचे विचारवंत डॉ. अविनाश डोळस यांचं निधन
डोळस सरांनी आत्तापर्यंत 35 पुस्तके लिहली आहेत. ज्यामध्ये कथा-कादंबऱ्यांचा समावेश आहे. सम्यक् दृष्टी, आंबेडकरी साहित्य, फुले-आंबेडकरी चळवळ आणि साहित्य, सामाजिक परिवर्तनाचे संदर्भ, मराठी दलित कथा, महासंगर आदी पुस्तक त्यांनी लिहिली.
औरंगाबाद : आंबेडकरी चळवळीचे एक विचारवंत आणि भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते डॉ. अविनाश डोळस यांचं निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी औरंगाबादेत अखेरचा श्वास घेतला. तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं डोळस यांचं निधन झाले. आज दुपारी चार वाजता छावणी स्मशानभुमी येथे अंत्य विधी होणार आहे.
डॉ. अविनाश डोळस राज्य सरकारच्या डॉ. आंबेडकर चरित्र, साहित्य, साधने व प्रकाशन समितीचे सदस्य सचिव होते. मिलिंद कला महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यांनी 35 वर्षे मिलिंद का कलामहाविद्यालयात ज्ञानदानाचे काम केलं. डोळस सरांनी आत्तापर्यंत 35 पुस्तके लिहली आहेत. ज्यामध्ये कथा-कादंबऱ्यांचा समावेश आहे. सम्यक् दृष्टी, आंबेडकरी साहित्य, फुले-आंबेडकरी चळवळ आणि साहित्य, सामाजिक परिवर्तनाचे संदर्भ, मराठी दलित कथा, महासंगर आदी पुस्तक त्यांनी लिहिली.
जानेवारी 1990 मध्ये झालेल्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद तर, जानेवारी 2011 मधील चंद्रपुरातील घुग्गुस येथे भरलेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद डोळस यांनी भूषवलं होतं. तसेच त्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बहुजन महासंघाचे नेते होते. त्यांनी आंबेडकरी विषयांवर काही पुस्तकेही लिहिली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement