एक्स्प्लोर

औरंगाबादमध्ये गतीमंद मुलीचा विनयभंग करणारे 'ते' दोघे अल्पवयीन असल्याचा दावा, चालकच करायचा मदत

गतीमंद मुलांच्या शाळेच्या स्कूलबसमध्ये घुसून काही टवाळखोरांनी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. याप्रकरणी चालकासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

औरंगाबाद : गतीमंद मुलांच्या शाळेच्या स्कूलबसमध्ये घुसून काही टवाळखोरांनी एका अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग केल्याचा धक्कादायक व्हीडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. यातील चालक आरोपी अविनाश शेजुळ याला 23 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, दोन आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा केल्याने त्यांना सुधारगृहात पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. पोलीसांनी सर्व आरोपींचे मोबाईल ताब्यात घेतले असून फॉरेन्सिक लॅबला पाठवणार आहे. गतीमंद मुलांच्या स्कूल बसमध्ये घुसून एका अल्पवयीन गतिमंद मुलीची छेड काढून विनयभंगाची घटना औरंगाबाद येथे घडल्याचे समोर आले आहे. या प्रकारात स्कूलबसचा चालकच सहभागी असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या टोळीकडून मागील अनेक दिवसांपासून असे प्रकार सर्रास सुरू असल्याचे देखील वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून 18 जानेवारीला समोर आले आहे. विनयभंग करुन ते नराधम शांत न बसता या प्रकाराचे चित्रीकरण करून ते व्हायरलही करीत होते. काही दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. विशेष म्हणजे यात स्कूलबसचा चालकही त्यांना मदत करीत होता. व्हीडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. औरंगाबादमध्ये टोळक्याकडून गतीमंद मुलीचा विनयभंग आणि मारहाण, व्हिडिओ व्हायरल चालकच करायचा मदत - औरंगाबाद परिसरात गेल्या वीस वर्षांपासून गतीमंद मुलांची शाळा चालवण्यात येते. या शाळेत मुलीच्या पालकांनी मुलींना शाळेत जाण्यासाठी एक खासगी बस लावली होती. शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर मुली घरी परतण्यासाठी निघालेल्या या स्कूल बसच्या चालकाने रस्त्यात बस थांबवली. यावेळी दोन तरुण बसमध्ये घुसले. या बसमध्ये घुसून या टवाळखोरांनी निर्लज्जपणे एका अल्पवीय गतीमंद मुलीची छेड काढून विनयभंग केला. मुलगी किंचाळत होती रडत होती. मात्र हे टवाळखोर त्या मुलीचा व्हीडीओ काढण्यामध्ये दंग होते. हे नराधम हे एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी या व्हीडीओचा व्हाट्सअप स्टेटस ठेवला. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे स्कूलबसच्या चालकाच्या उपस्थितीतच हा अश्‍लाघ्य प्रकार सुरू होता. याप्रकरणी शहरातील सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चालकास अटक केली असून त्याला पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर, दोन आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा केल्याने त्यांना सुधारगृहात पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. VIDEO | गतीमंद तरुणीवर नातेवाईकांकडून सामूहिक अत्याचार | स्पेशल रिपोर्ट | नागपूर | एबीपी माझा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget