एक्स्प्लोर

'द कपिल शर्मा शो'मध्ये फक्त खुर्चीवर बसून 8 कोटी कमावते अर्चना पूरन सिंह; अब्जावधींचं नेटवर्थ अन् आलिशान व्हिला पाहून तुम्हालाही वाटेल हेवा

Archana Puran Singh: अर्चना पूरण सिंहनं आपल्या हसण्याच्या हटके अंदाजानं कपिल शर्माच्या शोमध्ये स्वतःचं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती कपिल शर्माच्या शोचा अविभाज्य घटक बनली आहे. नवज्योत सिंह सिद्धू यांची जागा घेऊन त्यांनी शोमध्ये कायमस्वरूपी स्थान निर्माण केलं आहे.

Archana Puran Singh Net Worth: अभिनेत्री अर्चना पूरण सिंह (Archana Puran Singh) तिच्या हसण्याच्या आगळ्या वेगळ्या अंदाजामुळे आणि गमतीशीर व्हिडीओंमुळे नेहमीच चर्चेत अतात. इन्स्टाग्रामवर तिचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Video Viral) होत असतात. पण, तुम्ही विचार केलाय का? 'द कपिल शर्मा शो'मध्ये (The Kapil Sharma Show) फक्त खुर्चीवर बसून हसताना दिसणाऱ्या अर्चनाचं नेट वर्थ किती असेल?

'द कपिल शर्मा शो'मध्ये खुर्चीवर बसून हटके स्टाईलमध्ये हसणारी अर्चना नेहमीच आपण पाहतो. अनेकदा सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन सुरू असून अर्चना त्यामध्ये दिसत आहे. गेल्या अनेक सीझन्सपासून ती कपिल शर्मा शोमध्ये दिसतेय. प्रेक्षकांना तिची आणि कपिलची बॉन्डिंग आणि मध्येच कपिलनं गमतीनं तिला केलेलं ट्रोल पाहायला प्रचंड आवडतं. अनेकदा शोमध्ये कपिल अर्चनाची खिल्ली उडवतो, पण अर्चना फक्त हसते. ना कधी चिडत, ना कधी त्रागा करत. पण, तुम्हाला माहितीय का? कपिलसोबत दिसणारी अर्चना पूरण सिंग फक्त खुर्चीवर बसून हसण्याचे तब्बल 8 कोटी रुपये घेते. जाणून घेऊयात, अर्जनाच्या नेटवर्थबाबत... 

अर्चना पूरण सिंहनं आपल्या हसण्याच्या हटके अंदाजानं कपिल शर्माच्या शोमध्ये स्वतःचं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती कपिल शर्माच्या शोचा अविभाज्य घटक बनली आहे. नवज्योत सिंह सिद्धू यांची जागा घेऊन त्यांनी शोमध्ये कायमस्वरूपी स्थान निर्माण केलं आहे. पण, अर्चनाला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे. अर्चना पूरण सिंगने तिच्या करिअरची सुरुवात काही दशकांपूर्वी बी-ग्रेड चित्रपटातून केली होती. त्याची पहिली भूमिका केवळ 10 सेकंदांची होती, पण, हळूहळू तिनं स्वतःला इंडस्ट्रीमध्ये सिद्ध केलं. आज, चित्रपटांव्यतिरिक्त तिनं तिने कॉमेडी शो आणि ओटीटीवर वर्चस्व गाजवलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Archana Puran Singh (@archanapuransingh)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मधील एका एपिसोडसाठी अर्चना पूरण सिंगला 8 लाख रुपये फी मिळते. एका सीझनमध्ये ती तब्बल 8 कोटी रुपये कमावते. याशिवाय ती चित्रपट, कॉमेडी शो आणि सोशल मीडियातूनही अर्चना भरपूर कमाई करते. अर्चनाच्या एकूण संपत्तीबाबत बोलायचं झालं तर, ती 235 कोटी रुपये म्हणजेच 2.35 अब्ज रुपयांची मालकीण आहे. अर्चना राजेशाही थाटात राहाते. मड आयलंडमध्ये तिचा एक आलिशान व्हिला आहे. ज्याची किंमत तब्बल 12 कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे. अर्चनाचा आलिशान व्हिला पाहून कुमालाही नक्कीच तिचा हेवा वाटेल. एवढंच काय तर अर्चना नेट वर्थच्या बाबतीत कपिल शर्मालाही मागे टाकते. 

View this post on Instagram
 
A post shared by Archana Puran Singh (@archanapuransingh)

अर्चना पूरण सिंह यांच्याकडेही अनेक आलिशान गाड्या आहेत, ज्यांची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. यामध्ये Mercedes-Benz E-Class, Audi A8, BMW X5, Jaguar F-Pace, Land Rover Range Rover Evoque आणि Porsche Panamera सारख्या नावांचा समावेश आहे. अर्चनानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिच्याकडे कपिल शर्मापेक्षा जास्त कार्स आहेत.

(वरील सर्व माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आलेल्या दाव्यांवरुन पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही...)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget