Anjali Damaniya On Walmik Karad Mcoca: वाल्मिक कराडवर मकोका लागला; अंजली दमानियांनी आता दुसरा मॅटर बाहेर काढला
Anjali Damaniya On Walmik Karad Mcoca: वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
Anjali Damaniya On Walmik Karad Mcoca: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या (Santosh Deshmukh Murder Case) सहभागात संशयित म्हणून वाल्मीक कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला असून, आज वाल्मिक कराड (Walmik Karad) याला पुन्हा बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंयत आठ आरोपींवर मकोका गुन्हा दाखल आहे.
वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी एक्सवर (आधीचे ट्विटर) पोस्ट करत नवीन प्रकरणाची एफआयआर दाखवत आरोप केला आहे. तसेच या प्रकरणानंतर गृहमंत्र्यानी या एफआयआरवर काय कारवाई केली?, असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?
वाल्मिक कराड आणि एका वेगळ्या प्रकरणात झालेला आणखी एक मोठा FIR.
गृहमंत्र्यांनी आम्हाला सांगावे की या FIR वर काय कारवाई केली गेली
FIR क्रमांक ०१०८ / २०२४
तारीख ३ जुलै २०२४
आयपीसी ३०७ : जीवे मारण्याचा प्रयत्न करणे.
आयपीसी ३२३ : स्वेच्छेने दुसऱ्याला मारण्याच्या किंवा दुखापत करण्याच्या हेतूने त्रास देते किंवा एखाद्याने शरीराच्या कोणत्याही भागाला इजा पोहोचवणे
आयपीसी ३२६ : धोकादायक शस्त्रांनी स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे
आयपीसी ५०४ : "जो कोणी हेतुपुरस्सर अपमान करतो आणि त्याद्वारे कोणत्याही व्यक्तीला चिथावणी देतो, अशा चिथावणीमुळे सार्वजनिक शांतता भंग होईल किंवा इतर कोणताही गुन्हा केला जाईल असा हेतू आहे किंवा हे माहित आहे.
आयपीसी ५०६ : गुन्हेगारी धमकी
आयपीसी १४३ असा हल्ला करण्याच्या चिथावणीचा परिणाम हल्ला घडून आल्यास
आयपीसी १४८ दंगल, प्राणघातक शस्त्रांनी सज्ज...जो कोणी दंगल घडवून आणला असेल, प्राणघातक शस्त्राने सज्ज असेल किंवा गुन्ह्याचे हत्यार म्हणून वापरलेले, मृत्यूस कारणीभूत असण्याची शक्यता असेल अशा कोणत्याही गोष्टीने दोषी असेल
आयपीसी १४९ बेकायदेशीर असेंब्लीचा प्रत्येक सदस्य सामान्य वस्तूच्या खटल्यात केलेल्या गुन्ह्यासाठी दोषी आहे.
ह्या व्यतिरिक्त
शास्त्र अधिनियम ३
शास्त्र अधिनियम ४
शास्त्र अधिनियम २५
वाल्मिक कराड आणि एका वेगळ्या प्रकरणात झालेला आणखी एक मोठा FIR.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 15, 2025
गृहमंत्र्यांनी आम्हाला सांगावे की या FIR वर काय कारवाई केली गेली
FIR क्रमांक ०१०८ / २०२४
तारीख ३ जुलै २०२४
आयपीसी ३०७ : जीवे मारण्याचा प्रयत्न करणे.
आयपीसी ३२३ : स्वेच्छेने दुसऱ्याला मारण्याच्या किंवा दुखापत… pic.twitter.com/desXvyMnFx
खंडणी प्रकरण आणि खूनाच्या प्रकरणादरम्यान सहा फोन कॉल्स-
वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर पोलीस पुन्हा अॅक्शन मोडवर आली. त्यानंतर संतोष देशमुख प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. आज पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामध्ये पोलीस वाल्मिक कराडची पोलीस कोठडी मागितली जाईल. पोलिसांच्या सूत्रांनूसार, विष्णू चाटे आणि खून प्रकरणातील आरोपी यांच्यादरम्यानचे सहा कॉल झाल्याचं सांगण्यात येत आहे. खंडणी प्रकरण आणि खूनाच्या प्रकरणादरम्यान सहा फोन कॉल्स झालेले आहेत आणि हे सहा फोन कॉल्स वाल्मिक कराडसोबत झाले आहेत. याबाबत आज पोलीस न्यायालयात माहिती देऊ शकतात. खंडणी प्रकरण त्यानंतर विष्णू चाटे यांना झालेली मारहाण आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची झालेली हत्या या सगळ्याचे धागेदोरे वाल्मिक कराडसोबत जोडले जात आहे.
संबंधित बातमी:
Walmik Karad MCOCA: मकोका म्हणजे नेमकं काय? शिक्षा काय, वाल्मिक कराडची आता सुटका होणं कितपत शक्य?