Yavatmal News : शाब्बास रे पठ्ठया! दोन मिनिटांत सांगतो 120 तालुक्यांचे अचूक नाव; चिमुकल्यावर राज्यासह थेट मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप
Yavatmal News : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बंदि भागातील एकंबा गावातील इयत्ता सहावीत शिकणारा एक विद्यार्थी सध्या साऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.
Yavatmal News : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बंदि भागातील एकंबा गावातील इयत्ता सहावीत शिकणारा अनिकेत नावाचा विद्यार्थी अवघ्या दोन मिनीटात विदर्भातील 120 तालुक्यांची नावे घेतो. नुसते नावेच नाही तर कोणत्या जिल्ह्यात किती व कोणते तालुके आहे हे सुध्दा न अडखळता तो सांगतोय. कोणताही शिकवणी वर्ग नाही, शहराशी संपर्क नाही, घरी आईवडील ही मजुरीला जातात, आणि हा चिमुकला आजी आजोबांजवळ राहून जंगल भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत त्याने हे आचाट ज्ञान सापांदन केलंय. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान वायरल झाला असून तो थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापर्यंत जाऊन पोहचला आहे. अनिकेतचे हे अद्भुत ज्ञान पाहून मुख्यमंत्र्यांनीही त्याला कौतुकाची थाप देत शुभेच्छा दिल्याय.
दोन मिनिटांत सांगतो 120 तालुक्यांचे अचूक नाव
विद्यार्थ्यांना, सुशिक्षित पालक आणि शहरातील नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्यांनाही लाजवेल अशी कामगिरी एका प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्याने केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मुख्याध्यापक कल्याण बोंबले आणि विषय शिक्षक अविनाश नरवाडे या दोघांनी मिळून एक उपक्रम राबवला. याच शाळेतील एक विद्यार्थी आहे ज्याचं नाव अनिकेत रवींद्र पांडे असून जो सध्या इयत्ता सहावीत शिकत आहे. त्याचा विदर्भातील तालुक्यांचा व्हिडिओ प्रचंड लोकप्रिय होत आहे. अनिकेत अतिशय गरीब कुटुंबातील मुलगा आहे. त्याची आई अर्चना पांडे आणि वडील रवींद्र पांडे मजुरी करून आपली उपजीविका भागवतात. दरम्यान, अनिकेत नावाचा हा विद्यार्थी अवघ्या दोन मिनीटात विदर्भातील 120 तालुक्यांची नावे अचूक घेतो. नुसते नावेच नाही तर कोणत्या जिल्ह्यात किती आणि कोणते तालुके आहे हे सुध्दा तो न अडखळता तो सांगतोय. दरम्यान प्राथमिक शाळेचा हा व्हिडिओ प्रचंड वायरल झाला असून त्याला आता पाच कोटींहून आधिल व्ह्यूज मिळाले आहेत.
चिमुकल्यावर राज्यासह थेट मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप
विदर्भातील 11 जिल्हे आणि त्यातील 120 तालुक्यांची नावे मुखोदगत असलेला सहावीत शिकणारा अनिकेत रवींद्र पांडे...
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 28, 2025
नद्या आणि त्यांची उगमस्थाने सांगणारा, विभागश: जिल्ह्यांची नावे सांगणारा दुसरीतील सुदीप दीपक पांडे...
अशी अनेक उदाहरणे अलिकडे माझ्या पाहण्यात आली. अभ्यासाव्यतिरिक्त सामान्य… pic.twitter.com/oJndv08cDI
पाठांतर करण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ लागावी
एकविसावे शतक हे स्पर्धेचे आहे. भविष्यात अधिकारी होण्यासाठी शालेय स्तरापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी हा उपक्रम सुरु केला. स्वतःचे व्हिडिओ मोबाईलवर बघून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढत असून पाठांतर करण्याची चढाओढ लागली असल्याचे मुख्याध्याप कल्याण बोबले यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा