एक्स्प्लोर

Amravati : अमरावतीकरांना दिलासा; वाढलेल्या घरटॅक्सला स्थगिती देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

कुठल्याच विभागाचे अधिकारी अभ्यास करून आले नाही, ही पहिलीच बैठक आहे, म्हणून ठीक आहे. पण पुढच्या वेळेस असं चालणार नाही, असा दम फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिला.

Amravati News : उत्पन्नवाढीसाठी नुकतेच अमरावती शहरात महानगरपालिकेने (Amravati Municipal Corporation) 40 टक्के घरटॅक्स वाढीचा निर्णय घेतला. मात्र याला सर्वस्तरातून विरोध होत असून ही टॅक्सवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली होती. यावर नागरिकांना दिलासा देत या टॅक्सवाढीला स्थगिती देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यासोबतच चिखलदरा (CHIKHALDARA SKYWALK) येथील 'स्काय वॉक'चं काम लवकरच पूर्ण होईल आणि मेळघाटातील 24 गावात लवकरच विज पोहचविण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

अमरावती जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या (Amravati District Planning Committee) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेकांकडून अमरावतीत महानगरपालिकेने वाढविलेल्या घरटॅक्सवाढीचा मुद्दा उचलण्यात आला. यावर उत्तर देताना मनपा आयुक्त म्हणाले, 2002 पासून करवाढ केली नाही त्याअनुषंगाने ही मालमत्ता कर वाढविली आहे. 

एकत्र एवढा टॅक्स वाढवणे अयोग्य : फडणवीस

यावर पालकमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याला मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून स्थगिती देतो, पण अशाने लोकांमध्ये रोष निर्माण होतो. 2002 पासून जर घरटॅक्स वाढवला नाहीतर थेट 2022 मध्ये जर इतका टॅक्स वाढवला तर लोकं कुठून भरणार. एकावेळी इतका टॅक्स वाढवण चुकीचं आहे. अमरावती शहरात 40 टक्के अशा मालमत्ता आहे, ज्याच्यावर अजूनही काहीच टॅक्स मिळत नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिली. तसेच उत्पन्न वाढीसाठी या दिशेने प्रयत्न करण्याचे निर्देशही दिले.

बैठकीला गांभीर्याने घ्या

या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले. फडणवीस म्हणाले की, कुठल्याच विभागाचे अधिकारी अभ्यास करून आले नाही, ही पहिलीच बैठक आहे, म्हणून ठीक आहे. पण पुढच्या वेळेस असं चालणार नाही, असा दम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. तसेच विकासासाठी निधीची कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. यावेळी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Chandrakant Thakur) वगळता इतर सगळे आमदार, खासदार उपस्थित होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus In Maharasthtra: महाराष्ट्रात आज 366 जणांना कोरोनाची लागण, 5 रुग्णांचा मृत्यू; दिवसभरात 574 कोरोनामुक्त

Sara Lee Dies Aged 30: मोठी बातमी! डब्लूडब्लूई स्टार सारा लीचं वयाच्या 30व्या वर्षी निधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चाZero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामनेABP Majha Headlines | एबीपी माझा 10 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Supriya Sule Full PC : वर्दीची भीती राहिली नाही, पुणे अपघात प्रकरणी सरकारवर निशाणा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget