अकोल्यात बनावट नोटा चालनात आणणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, 500 रुपयांच्या 194 नोटा जप्त, तीन आरोपींना अटक
अकोल्यात बनावट नोटा चालणात आणणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाने भारतीय चलनातील 500 रुपयांच्या 'नकली नोटा' रॅकेटमध्ये 3 जणांना अटक केली आहे.

Akola News : अकोल्यात बनावट नोटा चालणात आणणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाने भारतीय चलनातील 500 रुपयांच्या 'नकली नोटा' रॅकेटमध्ये 3 जणांना अटक केली आहे. अकोला जिल्ह्यातील गुडधी आणि मुर्तीजापुरात पोलिसांनी या नकली नोटा पकडल्या आहेत. तब्बल 500 रुपयांच्या एकूण 97 हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत.
पाचशे रुपयांच्या या 194 नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न होत होता, मात्र ऐनवेळी पोलिसांनी चंदन धांडोरे नामक तरुणाला अटक केली. तो मार्केटमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा घेऊन फिरत होता. त्यानंतर मूर्तिजापुरातून अन्य दोन जणांना अटक केलीय. या कारवाईत पोलिसांनी तब्बल पाचशे रुपयांच्या 194 बनावट नोटा जप्त केल्या. या सर्व नकली नोटा बुलढाणा जिल्ह्यातून अकोल्यामध्ये आणण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. चंदन भिमराव धांडोरे, जहीरोद्दीन जबीरोद्दीन आणि विठ्ठल वारोकार असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यातील दोघेजण अकोला शहरालगत असलेल्या गुडधी येथील रहिवासी आहेत. तर अन्य एक मुर्तीजापुर तालुक्यातील रहिवासी आहे.
Before You Go
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान






















