(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akola : नवव्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनात विचारांचा 'जागर'
Akola: अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्त्व प्रणालीनुसार वंदनीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज सेवा समिती अकोला'च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय संमेलनाचे उदघाट्न आज थाटात पार पडले.
Akola : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्त्व प्रणालीनुसार वंदनीय राष्ट्रसंत 'राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज सेवा समिती अकोला'च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय संमेलनाचे उदघाट्न आज थाटात पार पडले. अकोला येथील केशवनगरस्थित जानोरकर मंगल कार्यालय येथे हे संमेलन पार पडत आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून 'स्वच्छ व निर्मल ग्राम'चे प्रणेते चंदुभाऊ पाटील मारकवार हे उपस्थित होते. तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. सचिन रमेश म्हैसणे यांची उपस्थिती होती. या संमेलनाचे उद्घाटन आमदार अमोल मिटकरी यांनी केले. तर या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.जावेद पाशा, जेष्ठ पत्रकार आणि संपादक किरण अग्रवाल, 'प्रभात किड्स'चे संचालक डॉ. गजानन नारे, कृष्णा अंधारे, डॉ. संतोष हुसे, हरीदिनी वाघोडे, रवी मानव, सुशील वणवे, प्रशांत गावंडे, गुणवंतराव जाणोरकर, योगिता पावसाळे, शुकदास महाराज, डॉ. दिलीप काळे, ज्ञानेश्वर रक्षक, प्राचार्य शांताराम बुटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ रामेश्वर बरगट यांनी केले. स्वागतध्यक्ष डॉ सचिन म्हैसने यांनी आपले स्वागताध्यक्ष म्हणून विचार व्यक्त केलेत. यावेळी प्रशांत गावंडे कृष्णा अंधारे संतोष हुसे दिलीप काळे किरण अग्रवाल रामेश्वर फुंडकर आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या उदघाटन सत्राचे संचालन कृष्णा पखाले यांनी केले तर राजेंद्र झामरे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऍड संतोष भोरे, गोपाल गाडगे, ज्ञानेश्वर साकारकर, सचिन माहोकार, कृष्णा पखाले, प्रतीक दुतोंडे, दिनेश सरप, शेखर साबळे, राजेंद्र झामरे, डॉ प्रकाश मानकर श्रीकृष्ण ठोंबरे डॉ रामेश्वर लोथे, डॉ. धर्मपाल चिंचोलकर, प्रतीक टाले, आकाश हरणे आदींनी परिश्रम घेतले.
राष्ट्रसंतांच्या विचाराने मला घडवलं : संमेलनाध्यक्ष चांदुभाऊ पाटील मारकरवार
साहित्याचा आणि माझा काहीच संबंध नाही, असे असतांना मला अशा विचार साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. हा मान मिळत असतांना मला अजूनही चिंतन करावेसे वाटते, कारण हा विचार मला आत्मसात करण्याचा माझा संकल्प मी सुरु केला आहे. माझ्या सामाजिक कार्याला खऱ्या अर्थाने समृद्ध राष्ट्रसंतांच्या विचाराने केले. मला घडवण्याचे काम राष्ट्रसंतांच्या विचाराने केले असे प्रतिपादन संमेलनध्यक्ष चांदुभाऊ पाटील मारकरावार यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या जीवनातील अनेक प्रसंग त्यांनी मांडले
राष्ट्रसंतांचे साहित्य शालेय पाठ्यपुस्तकात प्रकशित व्हावे : आ. अमोल मिटकरी
राष्ट्रसंतांनी सांगितलेला धर्म हा मानवतेचा धर्म आहे, सेवेचा धर्मं आहे. राष्ट्रसंतांचा विचार हा वैज्ञानिक आहे. काही जण आपण समाजसेवक वाटावं म्हणून सेवा करतात. काही पैसे कमवण्यासाठी सेवा करतात, मात्र राष्ट्रसंतांनी मानवतेची सेवा करण्याचा विचार सेवा मंडळाला दिला आहे. महाराजांचे साहित्य आपण वाचलं पाहिजे, आणि ही चळवळ व्यापक झाली पाहिजे, यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. मी गुरुदेव सेवा मंडळाचा आमदार आहे. त्यांच्या विचारमुळे मला विधान परिषदेवर स्थान मिळालं आहे हे सांगताना मला सार्थ अभिमान वाटतो. राष्ट्रसंतांचे साहित्य हे शालेय पाठयपुस्तकात आणण्यासाठी पुढाकार घेऊ तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांचे तैलचित्र विधानभावनात लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या उदघाट्नपर भाषणात केले.
यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून आजच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, आज अनेक बाबा जन्माला आले आहेत. त्यांनी अध्यात्मिकतेच्या नावाखाली धंदा मांडला याचा त्यांनी आपल्या भाषणातून खरपूस समाचार घेतला. अशी संमेलने संपूर्ण महाराष्टात झाली पाहिजे, प्रचारक वाढले पाहिजे, यासाठी सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चिंतन केले पाहिजे असे आवाहन आ. मिटकरी यांनी केले. आणि संमेलनाचे रीतसर झाल्याचे जाहीर केले. यावेळी उद्घाटन सत्राचे अध्यक्ष म्हणून आचार्य वेरुळकर गुरुजी यांनी आपले विचार व्यक्त केले.
ग्रामगिता जीवन गौरव पुरस्कार सोहळा थाटात :
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयुष्य झिजवणाऱ्या गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांना हा मानाचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पातुर येथील भजनसम्राट रामभाऊजी गाडगे यांच्या स्मृतिपित्यर्थ दिला जाणारा ग्रामगीता जीवनगौरव पुरस्कार सोहळा या संमेलनाचे वैशिष्ट्य ठरले . यावर्षीचा हा पुरस्कार अमरावती येथील गुरुदेव प्रचारक नामदेवराव गव्हाळे महाराज तर देवरी येथील जेष्ठ ग्रामगीता प्रचारक रामेश्वर चांडक यांना देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात रुग्णसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी विचारपीठावर गोपाल गाडगे उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवकांचा सत्कार :
यामध्ये सुशील महाराज वनवे, रवींद्र मुंडगावकर, एडवोकेट वंदन कोहाडे, शिवाजी म्हैसने, शेख गुरुजी, श्रीकृष्ण सावळे गुरुजी, राजेंद्र गाडगे, सम्राट डोंगरदिवे, बीएस तायडे, एडवोकेट कुणाल शिंदे, योगेश लबडे, अक्षय राऊत, प्रज्वल तायडे, सुशांत नीलकंठ, विपुल माने, उद्धव ठाकरे, महेश घनघाव, रोहन बुंदेले, प्रशांत नागे, राजेश टाले आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाचे संचालन सचिन माहोकार यांनी केले.
ग्रंथ दिंडीने वाजला साहित्य संमेलनाचा बिगुल :
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचा बिगुल ग्रंथादिंडीने वाजला.ग्रंथ दिंडीचे पूजन संत तुकाराम हॉस्पिटलच्या डॉक्टर व कर्मचारी यांनी केले. संत तुकाराम महाराज चौक येथून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. या ग्रंथ दिंडीमध्ये जय बजरंग विद्यालय कुंभारीचे स्काऊट गाईड चे शिस्तबद्ध संचलन आकर्षण ठरले. तर अनेक वारकरी दिंड्या या ग्रंथ दिंडीत सहभागी झाल्या होत्या. रस्त्यात ठिकठिकाणी ग्रंथ दिंडीचे स्वागत करण्यात आले. ग्रंथ दिंडीचा समरोप विचार साहित्य संमेलन स्थळी झाला.
वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद :
या विचार साहित्य संमेलन स्थळी राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १) सोशल मिडीया घडवतो की बिघडवतो ?, २) सुसंस्कार काळाची गरज, ३) स्वातंत्र्य संग्राम आणि राष्ट्रसंत या विषयावर ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील स्पर्धकांना प्रथम बक्षीस 3001 रुपये , द्वितीय बक्षीस 2001 रुपये, तृतीय बक्षीस 1000 रुपये व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांक वैष्णवी हगोने, द्वितीय पुरस्कार कृषी खत्री तृतीय पुरस्कार स्मित भोयर तर उत्तेजनार्थ पुरस्कार आदित्य डोळे वेदांत गावंडे नागसेन अंभोरे यांनी मिळवला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापक स्वप्निल इंगोले प्रा अंकुश मानकर प्रा. प्रतीक महल्ले यांनी केले.ही स्पर्धा शेखर साबळे, प्रतीक दुतोंडे दिनेश सरप यांच्या संयोजनात पार पडली.