एक्स्प्लोर

'शक्य तितक्या लवकर 100 शवपेट्या बनवा!' एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांचा नेमका फोन कुणाला? अहोरात्र लागले लोक कामाला  

अहमदाबाद विमान अपघातानंतर मृतांचे मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यासाठी लागणाऱ्या शवपेटीसाठी एअर इंडियाने वडोदरा येथील एका शवपेटी निर्मात्याला 100 शवपेटी बनवण्याचा ऑर्डर दिल्याची माहिती पुढे आलीय.

Air India Plane Crash In Ahmedabad: अहमदाबादमधील भीषण विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. या दुर्घटनेत 267  हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि आता मृतांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना पाठवण्याची तयारी सुरू आहे. अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या कॉलेजमधील शस्त्रक्रिया विभागाचे प्राध्यापक डॉ. रजनीश पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एअर इंडिया विमान अपघातात (Air India Plane Crash) मृत्युमुखी पडलेल्याचे मृतदेह डीएनए चाचणीद्वारे ओळखले आहेत आणि ते मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र डीएनए जुळवण्याची प्रक्रिया काळजीपूर्वक केली पाहिजे. त्याचे कायदेशीर आणि वैद्यकीय परिणाम आहेत, त्यामुळे ते करण्याची घाई करता येणार नसून पूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक पार पडल्यानंतर मृतदेह पीडित कुटुंबियांना दिली जातील, असेही ते म्हणाले.

"शक्य तितक्या लवकर 100 शवपेट्या बनवा!

अशातच ही प्रक्रिया पार पडत असताना मृतांचे मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यासाठी लागणाऱ्या शवपेटीसाठी एअर इंडियाने वडोदरा येथील एका शवपेटी निर्मात्याला 100 शवपेटी बनवण्याचा ऑर्डर दिला आहे, त्यापैकी 25 शवपेटीका शनिवारी अहमदाबादला पाठवल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. 

वडोदरा येथील शवपेटी बनवणारे नेल्विन राजवाडी यांनी पत्रकारांना सांगितले की, "13 जून रोजी रात्री 8.30 वाजता मला एअर इंडियाच्या व्यवस्थापकाचा फोन आला. कोणीतरी त्यांना माझा नंबर दिला होता. त्यांनी सांगितले की त्यांना 100 शवपेटींची आवश्यकता आहे. मी सांगितले की इतक्या शवपेटी लगेच बनवणे कठीण आहे, पण आम्ही हे काम सुरू केले."

एवढ्या मोठ्या प्रमाणात शवपेट्या बनवणं खूपच कठीण होतं, पण... 

त्यांनी पुढे सांगितलं की, “आज (शनिवारी) सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही जमलो आहोत आणि घरीही गेलो नाही. मेथोडिस्ट चर्चच्या फादरने आम्हाला जागा दिली आणि शवपेटी बनवण्यासाठी सर्व साहित्य दिले, ज्यात पांढऱ्या कापडाचाही समावेश होता.

पुढे ते म्हणाले की, “मी हे काम गेल्या 30  वर्षांपासून करत आहे आणि अखिल भारतीय रुग्णवाहिका सेवा देखील चालवतो. प्लीहाचा त्रास पाच दिवस टिकतो, तर कल्पना करा की या अपघातात कुटुंबांना काय सहन करावे लागले असेल. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात शवपेट्या बनवणं खूपच कठीण होतं, पण वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही थांबलोच नाही. काम तातडीने सुरू केलं." असेही ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा डॉक्टर, त्यांच्याशी ओळख, काम असल्यास करुन देऊ, व्हाटस ॲप ग्रुपवर मेसेज टाकणं पुण्यातील डॉक्टरला भोवलं, गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा डॉक्टर, काम असल्यास करुन देऊ, व्हाटस ॲप ग्रुपवर मेसेज टाकणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
Embed widget