एक्स्प्लोर

पक्ष तुमचा पण माणूस आमचा! विवेक कोल्हेंच्या सत्काराला विखे विरोधक एकवटले, जनतेच्या कामासाठी विखे पाटलांकडे जाणार

विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्यावर राहता तालुक्यात विवेक कोल्हेंचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला भाजपमधील विखे विरोधकांनी पाठ फिरवली.

Vivek Kolhe : अहिल्यानगर जिल्ह्यात विखे-कोल्हे यांच्यातील राजकीय संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता आहे. कारण विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्यावर राहता तालुक्यात विवेक कोल्हेंचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला भाजपमधील विखे विरोधक नव्हे, तर महाविकास आघाडी, मनसेचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपमधील विखे विरोधकांसह महाविकास आघाडीमधील स्थानिक नेत्यांनी नाव न घेता विखे पाटलांवर जोरदार निशाणा साधला. पक्ष जरी तुमचा, तरी माणूस आमचा" असं म्हणत काँग्रेसच्या प्रभावती घोगरेंनी विखेंवर टीका केली. तर वेळप्रसंगी जनतेच्या कामांसाठी कमीपणा घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे जाण्याची तयारी आहे असल्याचं विवेक कोल्हे यांनी म्हटलं. 

विवेक कोल्हेंच्या सत्काराला सर्व विखे विरोधक एकवटल्याचं चित्र 

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात विवेक कोल्हे यांची विधानपरिषदेवर निवड झाल्याबद्दल सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विवेक कोल्हेंच्या सत्काराला सर्व विखे विरोधक एकवटल्याचं चित्र पाहायला मिळालं. राहता तालुक्यात विवेक कोल्हेंचा सत्कार, या कार्यक्रमात स्थानिक मविआच्या नेत्यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला. पक्ष जरी तुमचा, तरी माणूस आमचा अशी टीका काँग्रेसच्या प्रभावती घोगरेंनी केली. जनतेच्या कामासाठी विखे-पाटलांकडे जाण्याची तयारी असल्याचंही कोल्हे यावेळी म्हणाले. 

Who is Vivek kolhe: कोण आहेत विवेक कोल्हे?

विवेक बिपिनदादा कोल्हे हे माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे नातू असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता बिपिन कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. ते अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक असून विविध ८ ते १० सहकारी संस्थांवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. ३६ वर्षीय विवेक कोल्हे यांचे प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले असून त्यांनी नाशिक येथे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून बीई सिव्हिल पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर २०१७ साली संजीवनी सहकारी साखर कारखान्यात संचालक म्हणून त्यांची निवड झाली व पुढे ते चेअरमन म्हणून नियुक्त झाले.

विवेक कोल्हे यांनी आपले आजोबा स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पावलावर पाऊल ठेवत तरुणांची संघटन बांधणी करत ‘संजीवनी युवा प्रतिष्ठान’ची ११ वर्षांपूर्वी स्थापना केली. अनेक सहकारी संस्थांमध्ये ते आपली कर्तव्ये पार पाडत असून संस्थात्मक राजकारणात मोठ्या प्रमाणात यश मिळवताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Who Is Vivek Kolhe : विखे-पाटलांना शह देणारा तरुण नेता, घरातूनच सहकाराच्या राजकारणाचं बाळकडू, भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिलेले विवेक कोल्हे कोण?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget