एक्स्प्लोर

Shirdi Crime : साई संस्थानच्या कर्मचाऱ्याचा प्रताप, दक्षिणा पेटीतून लाखोंची रोकड पळवली, 'असा' झाला भांडाफोड

Shirdi Crime : साईबाबा संस्थानच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने दानाची मोजदाद करताना लाखो रुपयांची रोकड चोरल्याचे उघडकीस आले आहे.

Shirdi Crime : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या (Shirdi Saibaba Sansthan) लेखा विभागात कार्यरत असलेल्या बाळासाहेब गोंदकर या शिपायाने दक्षिणा पेटीतून लाखो रुपयांची रोकड चोरल्याचे उघडकीस आले आहे. अविनाश विनायक कुलकर्णी, लेखाधिकारी, यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत साई संस्थानने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2025 मध्ये झालेल्या दक्षिणा मोजणीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत हा प्रकार समोर आला. लेखा विभागातील शिपाई बाळासाहेब नारायण गोंदकर याने दि. 4, 8 आणि 11 एप्रिल रोजी दक्षिणा मोजणीदरम्यान 500 रुपयांच्या नोटांचे बंडल चतुराईने लपवले आणि नंतर ते चोरून नेले. ही चोरी झालेली रक्कम अंदाजे सव्वा ते दीड लाख रुपये दरम्यान असण्याची शक्यता आहे. 16 एप्रिल रोजी दक्षिणा मोजणी पूर्ण झाल्यावर नोट मोजणी मशिनमध्ये 46 हजार 500 रुपये आणि 25 एप्रिल रोजी 500 रुपयांचा आणखी एक बंडल (45 ते 50 हजार रुपये) आढळून आला. 

कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई

या दोन्ही घटना संशयास्पद वाटल्याने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी गोंदकर नोटा लपवताना स्पष्ट दिसले. त्याने नोटा मांडीखाली, पॅन्टमध्ये आणि मशीनच्या मागे लपवून नंतर घेऊन गेल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या आदेशानुसार, अविनाश कुलकर्णी यांनी गोंदकर याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संस्थानने गोंदकर याला अगोदरच प्राथमिक माहितीवर निलंबित केले होते. गुरुवारी या संदर्भातील सविस्तर अहवाल प्राप्त होताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून बडतर्फीचीही कारवाई सुरू करण्यात आली आहे. शिर्डी पोलीस घटनेचा अधिक तापस करत आहेत.

46 लाखांची रोकड घेऊन फरार झालेला चोरटा जेरबंद 

दरम्यान, कोपरगावच्या टाकळी शिवारात स्वस्तात बिनशेती प्लॉट देतो असे म्हणत तब्बल 29 जणांकडून 46 लाख रुपये रक्कम घेऊन प्लॉटचा ताबा दिला आणि प्लॉट नावावर न करता दुसऱ्यालाच विकून फसवणूक करणारा शिवम दास याला कोपरगाव शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. 27 मार्च 2024 रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शिवम दास आणि त्याचा सहकारी दीपक करण यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, तेव्हापासून ते फरार होते. शिवम दास याने वर्षभर पोलिसांना गुंगारा दिला. अखेर एका प्रकरणात पुणे पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे व त्यांच्या पथकाने बुधवारी त्याला ताब्यात घेतले आहे.

आणखी वाचा 

Crime News : दररोज रात्री आईला द्यायची झोपेच्या गोळ्या, नंतर रात्रभर प्रियकराशी...; 15 वर्षीय मुलीच्या भयंकर कृत्याने खळबळ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LPG Crisis: गॅसऐवजी इथेनॉलचा वापर शक्य? कोपरगावमध्ये साखर कारखान्याचा अनोखा प्रयोग, इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन
गॅसऐवजी इथेनॉलचा वापर शक्य? कोपरगावमध्ये साखर कारखान्याचा अनोखा प्रयोग, इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Crime news: पारनेरमध्ये वारकरी संप्रदायाला काळिमा, वासनांध कीर्तनकार महाराजाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पारनेरमध्ये वारकरी संप्रदायाला काळिमा, वासनांध कीर्तनकार महाराजाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Embed widget