एक्स्प्लोर

Rohit Sharma : रोहितभाऊंना एकच विनंती, कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांचे 5 प्रश्न, रोहित शर्माची 5 धडाकेबाज उत्तरं

Rohit Sharma and Rohit Pawar : कर्जत तालुक्यातील राशीन येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

अहमदनगर : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या पुढाकाराने नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर  कर्जत तालुक्यातील राशीन येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) असल्याने तरुणांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमात रोहित पवारांनी रोहित शर्माला पाच प्रश्न विचारली. रोहित शर्माने या प्रश्नांची धडाकेबाज उत्तरे दिली आहे. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोहित पवार म्हणाले की, कसे आहात कर्जत जामखेडकर. आपल्या सर्वांचे लाडके हिटमॅन इथे आलेले आहेत. आपल्या सर्वांसाठी त्यांनी आणि आपल्या टीमने वर्ल्ड कप जिंकून दिला आहे. त्यामुळे रोहित शर्मा यांच्या आवाजाचा जयघोष मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. असे म्हणताच उपस्थित तरुणांनी रोहित...रोहित...रोहित....रोहित... असा एकच जल्लोष केला. यानंतर रोहित पवार यांनी रोहित शर्माला पाच प्रश्न विचारले.  

रोहित शर्माची 5 धडाकेबाज उत्तरं

1) आमच्या ग्रामीण भागात कर्जत जामखेडमध्ये आल्यानंतर आणि राशीनच्या या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसा वाटत आहे? असे विचारले असता रोहित शर्मा म्हणाला की, मला पवित्र वाटतंय. आपण जेव्हा गाडीत येत होतो तेव्हा मला वाटत होते की इथे किती शांतता आहे. या क्रिकेट अकॅडमीच्या निमित्ताने मला इकडे यायला मिळाले. त्यामुळे मला भरपूर आनंद झालाय. मी परत इकडे येण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार, असे त्याने म्हटले. 

2) कर्जतचे महाराष्ट्रात वजन महाराष्ट्रात वाढलेले आहे. पण, इथे असलेल्या आमच्या नागरिकांचा आवाज तुम्हाला कसा वाटला? असे विचारले असता रोहित शर्मा म्हणाला की, स्टेडियमपेक्षा मोठा येथे आवाज वाटतोय, असे उत्तर त्याने दिले. 

3) तुम्ही क्रीक किंगडम अकॅडमी ग्रामीण भागात सुरू करत आहात. कर्जत जामखेडमध्ये, राशीनमध्ये सुरू करत आहात. त्यामुळे या भागातून उद्याचे रोहित शर्मा आपल्याला देशासाठी मिळतील, असं तुम्हाला वाटतं का, असं विचारले असता, मला पूर्ण आत्मविश्वास आहे. मी बघतोय की इकडे सगळ्यांमध्ये क्रिकेटची खुप आवड आहे. मला यात कुठलीही शंका नाही की, इथून पुढचे जसप्रीत बुमराह, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल मोहम्मद सिराज सगळे इकडूनच येणार, असे रोहित शर्माने म्हटले.  

4) राशीनला आपण एक स्टेडियम सुरू करत आहोत. कर्जतला आणि जामखेडलाही आपण स्टेडियम सुरू करणार आहोत. त्यामुळे कर्जत आणि जामखेडकरांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की, पुढचे स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आम्ही जेव्हा सुरू करू तेव्हा तुम्ही भूमिपूजनासाठी तिथे यावं असे म्हटले असता रोहित शर्मा म्हणाला की, मी इथे नक्कीच येणार येणार आहे. 

5) रोहित भाऊ तुम्हाला विनंती करतो की, आम्हाला अजून एक वर्ल्ड पाहिजे. आणि वर्ल्ड कप घेत असताना आम्हाला कॅप्टन म्हणून कोणाला बघायचंय असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थितांना विचारला. यावेळी उपस्थितांमधून रोहित...रोहित...रोहित... असा जयघोष पहायला मिळाला. यावेळी शर्माने तरुणांचे आभार मानले.  

आणखी वाचा 

पुढचे यशस्वी जयस्वाल, जसप्रीत बुमराह कर्जत-नगरमधूनच येणार; राशीनमध्ये रोहित शर्माच्या हस्ते भव्य मैदानाचं उद्घाटन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget