मोठी बातमी : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या बातम्या, पण लंके म्हणतात...
Nilesh Lanke : पारनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे राजीनामा देणार अशा माध्यमातून आलेल्या बातम्यांवर स्वत लंके यांनी खुलासा केला आहे.
![मोठी बातमी : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या बातम्या, पण लंके म्हणतात... MLA Nilesh Lanke has resigned Discussion In Ahmednagar Lok Sabha Constituency resigned news is fake news Disclosure by Nilesh Lanke marathi news मोठी बातमी : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या बातम्या, पण लंके म्हणतात...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/14/bf6b76caaf9f333c7611f38d890498bb1710404902534737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ahmednagar Lok Sabha : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक (Ahmednagar Lok Sabha Election) लढवणार असल्याची चर्चा आहे. यासाठी ते शरद पवारांच्या गटात (Sharad Pawar Group) प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. अशात आता निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा (Nilesh Lanke Resigns) देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर बोलतांना लंके यांनी खुलासा केला असून, राजीनामा देण्याच्या बातम्या अफवा असल्याचे म्हटले आहे. मात्र, याचवेळी शरद पवार गटात जाणार का? या प्रश्नाचे उत्तर देतांना लंके यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
पारनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे राजीनामा देणार अशा माध्यमातून आलेल्या बातम्यांचे स्वतः आमदार निलेश लंके यांनी खंडन केलं आहे. माझा राजीनामा द्यायचा आणि मलाच माहिती नाही अशी प्रतिक्रीया आमदार निलेश लंके यांनी दिली आहे. मला सकाळी काही लोकांचे फोन आले, त्यांनी ही गोष्ट मला सांगितली. पण असं काहीही नाही. मला जर एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर तो मी माझ्या मतदारांना विचारात घेऊन घेईल असं लंके यांनी म्हंटले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात जाणार का? या प्रश्नाला उत्तर देताना राजकारण कधीही कोणत्या वळणावर जाऊ शकते असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली होती
निलेश लंके शरद पवार गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. अशात निलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या राष्ट्रवादी भवन येथे महाविकास आघाडीच्या महत्वाच्या बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके देखील उपस्थित होते. त्यामुळे लंके शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना अधिक वेग आले आहे.
सुजय विखे विरुद्ध निलेश लंके लढत...
भाजपकडून अहमदनगर लोकसभेसाठी भाजपकडून पुन्हा एकदा सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही जाहीर करण्यात आला नाही. दरम्यान, निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करून अहमदनगर लोकसभा लढवणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे असे झाल्यास अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत पाहायला मिळेल.
इतर महत्वाच्या बातम्या :
Amol Kolhe : लंकेंना आणलं, आता पवारांकडून आणखी एक टास्क? अमोल कोल्हे 'इन्कमिंग'वर स्पष्टच बोलले!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)