एक्स्प्लोर

Shirdi Saibaba : शिर्डीत रामनवमी यात्रेत फिरता पाळणा अचानक कोसळला, चौघे जखमी तर एकाची प्रकृती गंभीर

Shirdi Saibaba : शिर्डीच्या रामनवमी (Ramnavmi) उत्सव यात्रेत असलेल्या फिरता पाळणा (Palna) अचानक निखळल्याची घटना घडली.

Shirdi Saibaba : शिर्डीच्या रामनवमी (Ramnavmi) उत्सवात धक्कादायक घटना घडली असून यात्रेत असलेला पाळणा (Palna) अचानक तुटल्याची घटना घडली. या घटनेत पाळण्यात बसलेले चौघे भाविक जखमी (Injured) झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. काल सायंकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सध्या शिर्डीत रामनवमीचा उत्साह सुरु असल्याने भाविकांची गर्दी आहे. 

राज्यभरात रामनवमीचा उत्साह सुरू असून शिर्डी (Shirdi) येथील रामनवमी यात्रेनिमित्त प्रसादालयासमोर भरवण्यात आलेल्या जत्रेतील जमिनीवरील फिरता पाळणा निखळून झालेल्या दुर्घटनेत चोघे जण जखमी झाल्याची घटना काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत ज्योती किशोर साळवे, किशोर पोपट साळवे यांना अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले होते. तर भूमिका साबळे‌ ही किरकोळ जखमी असून प्राथमिक उपचारानंतर तिला घरी पाठविण्यात आले आहे. प्रविण आल्हाट हे सुद्धा या घटनेत जखमी झाले आहेत. जखमींना आर्थिक मदतीची मागणी नातेवाईकांनी केली आहे. 

दरम्यान, शिर्डी साईबाबा मंदिर (Saibaba Mandir) परिसरात रामनवमीचा उत्साह आहे. राज्यभरातून भाविक शिर्डीत दाखल झाले असल्याने जत्रेचे स्वरूप आले आहे. अशातच परिसरात पाळणे, खेळण्यांची दुकाने यासह विविध दुकानांची रेलचेल पाहायला मिळत आहे. अशातच काल रात्री पाळणा निखळल्याची घटना घडली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी दूरध्वनीवरून जखमींची विचारपूस केली आहे. साईबाबा रूग्णालयात उपचारासाठी दाखल जखमी रूग्णांवर तात्काळ उपचार करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत‌. त्यापैकी दोघांना नाशिकला (Nashik) हलविण्यात आले असून इतर जखमींवर साईबाबा रूग्णालयातील (Saibaba Hospital Shirdi) वैद्यकीय उपसंचालक डॉ. प्रितम वडगावे यांच्या देखरेखीखाली जखमींवर उपचार सुरू आहेत. पाळणा निखळून पडण्याच्या घटनेनंतर सर्व पाळणे बंद‌ करण्यात आले होते.. 

घटनेनंतर सर्व पाळणे बंद.... 

राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे आणि खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे यांच्याकडून दूरध्वनीवरून घटनेची माहिती घेतली आहे. पालकमंत्र्यांनी डॉ. प्रितम वडगावे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधला असून जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पाळणा निखळून पडण्याच्या घटनेनंतर सर्व पाळणे बंद‌ करण्यात आले असल्याचेही प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
Embed widget