एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election 2024 : अहमदनगरच्या शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात इच्छुकांची रांग, आता 'या' मातब्बर महिला नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!

Vidhan Sabha Election 2024 : अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता एका मातब्बर महिला नेत्याने विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तशी इच्छुक उमेदवारांची संख्या देखील वाढत आहे. अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये (Shevgaon Pathardi Assembly Constituency) इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या खंद्या समर्थक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. 

हर्षदा काकडे (Harshada Kakade) यांच्या भूमिकेने भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एकेकाळी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या हर्षदा काकडे यांना 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही, मात्र आता मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी करायची किंवा अपक्ष निवडणूक लढवायची असा निश्चय त्यांनी केला आहे. 

40 वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य

हर्षदा काकडे आणि त्यांचे पती विद्याधर काकडे मागील 40 वर्षांपासून या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य आहेत. यासोबतच शैक्षणिक संस्था आणि सामाजिक कामामुळे या दाम्पत्याची मतदारसंघात चांगली ओळखही आहे. हे सगळं असलं तरी शेवगाव पाथर्डी मतदारसंघात सध्या भाजपच्या मोनिका राजळे आमदार आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रताप ढाकणे निवडणुकीची तयारी करत आहेत. 

कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढणार : हर्षदा काकडे

याबरोबरच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चंद्रशेखर घुले देखील मतदार संघामध्ये चाचपणी करत आहेत. त्यातच हर्षदा काकडे यांनी देखील मतदार संघामध्ये चाचपणी केली असून कुठल्याही परिस्थितीत आपण ही निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये नेमके किती उमेदवार उभे राहतील आणि कोण कोणाला पाठिंबा देईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

संगमनेरमधून सुजय विखे इच्छुक

दरम्यान, अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पराभव केल्यानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. मला संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल. इतर मतदारसंघात नको. पक्षाने आदेश दिल्यास संगमनेर मधूनच उमेदवारी करणार आहे. मी संगमनेर मधूनच विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे संगमनेर विधानसभा मतदारसंघात आता बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे लढत पाहायला मिळणार का? याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. 

आणखी वाचा

Sharad Pawar : शरद पवार मोठा डाव टाकण्याच्या तयारीत, संकटमोचक गिरीश महाजनांविरोधात भाजपच्या मात्तबर नेत्याला तिकीट?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
Maharashtra Live blog: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
Maharashtra Live blog: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
Mumbai Mayor Election 2026: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंचं वक्तव्य जाणीवपूर्वक?
मुंबईच्या महापौर आरक्षणाबाबतच्या 'त्या' नियमाने सगळाच डाव पलटणार, भाजपला झटका, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य खरं ठरणार?
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
Embed widget