एक्स्प्लोर

अजित पवारांमध्ये ती हिम्मत आहे का? रोहित पवार पहिल्यांदाच आक्रमक

Ajit Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातून बाहेर जावं, अशी म्हणायची हिंमत अजित पवार यांच्यामध्ये आहे का ? असा घणाघात रोहित पवार यांनी केलाय. ते कर्जत, अहमदनगरमध्ये बोलत होते. 

Rohit Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यामध्ये शाब्दिक वाद, आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. याचाच पुढील अंक म्हणजे आता रोहित पवार यांनी थेट अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी राजकारणातून बाहेर जावं, अशी म्हणायची हिंमत अजित पवार यांच्यामध्ये आहे का ? असा घणाघात रोहित पवार यांनी केलाय. ते कर्जत, अहमदनगरमध्ये बोलत होते. 

अजित पवारांमध्ये ती हिम्मत आहे का? 

रोहित पवार यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित अजून बच्चा असल्याचं म्हणत उपरोधिक टीका केली होती. यावर रोहित पवार यांनी देखील "बच्चे मन के सच्चे" असं म्हणत अजित पवारांसाठी मी बच्चाच आहे. कारण ते माझे काका आहेत. पण अजितदादा नेहमी सगळ्यांच्या वयावर बोलतात, कधी ते मला बच्चा म्हणतात तर कधी ते पवार साहेबांचं वय झालं म्हणतात. मात्र ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयावर कधी बोलत नाहीत.काही वर्षांत मोदी 80 वर्षांचे होतील, मग त्यांनी राजकारणातून बाहेर गेलं पाहिजे अशी म्हणण्याची हिम्मत त्यांच्यात आहे का ? असा घणाघात रोहित पवारांनी केला.

...म्हणून जवळच्या लोकांमध्ये आम्ही रेष ओढली-रोहित पवार

आमदार रोहित पवार यांना ईडीने नोटीस पाठवली, त्यांच्या कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस पाठवली, या सर्व कारवाया युवा संघर्ष यात्रेत सरकार विरोधी भूमिका घेतल्यामुळेच झाल्याचे रोहित पवार म्हणाले. या कारवाया करतांना घरातील जवळच्या व्यक्तींचा समावेश होता का? या प्रश्नांला उत्तर देताना रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला.जवळचे लोक पण असतात, पण राजकारण म्हटलं की कुठेतरी एक रेष ओढावी लागते. ती आम्ही ओढली आहे, रोहित पवारांनी म्हटले आहे. 

राधाकृष्ण विखे पाटलांवर सडकून टीका - 

तलाठी भरतीवरून सध्या राज्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाल्याचा पाहायला मिळत आहे. तलाठी भरती वरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. या भरतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.तर ही भरती पारदर्शक पद्धतीने झाली आहे, जर कोणी अशा पद्धतीने सरकारची बदनामी करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असा इशारा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता, याबाबत माझाशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. विखे पाटलांच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना 200 पैकी 214 गुण ते देणार का? आणि कुणालाही डॉक्टर करणार का? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला आहे. त्याचबरोबर शिक्षक भरती वरून देखील त्यांनी सरकारला घेरलं आहे. 

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washington Firing : अमेरिकेत ज्यू संग्रहालयाबाहेर गोळीबार, इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; अमेरिकेचा टार्गेट किलिंगचा आरोप
अमेरिकेत ज्यू संग्रहालयाबाहेर गोळीबार, इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; अमेरिकेचा टार्गेट किलिंगचा आरोप
एखाद्याच्या विचारसरणीसाठी जेलमध्ये टाकू शकत नाही, आम्ही ही प्रवृत्ती पाहत आहोत; न्यायालयाची 'सर्वोच्च' टिप्पणी
एखाद्याच्या विचारसरणीसाठी जेलमध्ये टाकू शकत नाही, आम्ही ही प्रवृत्ती पाहत आहोत; न्यायालयाची 'सर्वोच्च' टिप्पणी
Dhule News : धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड, अनिल गोटेंचा 'तो' आरोप खरा ठरला; पोलिसांनी 102 क्रमांकाची खोली उघडली अन्...
धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड, अनिल गोटेंचा 'तो' आरोप खरा ठरला; पोलिसांनी 102 क्रमांकाची खोली उघडली अन्...
Weather Update : देशात एकाचवेळी भीषण गर्मी अन् मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार; वीज, झाडे कोसळून 24 जणांचा अंत, श्रीगंगानगरमध्ये 47.6 डिग्री तापमान
देशात एकाचवेळी भीषण गर्मी अन् मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार; वीज, झाडे कोसळून 24 जणांचा अंत, 11 होरपळले, श्रीगंगानगरमध्ये 47.6 डिग्री तापमान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 22 May 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPahalgam Terror Atttack : पहलगाम हल्ल्याला 1 महिना झाला पण मारेकरी दहशतवाद्यांचा ठावठिकाणा नाहीJyoti Malhotra Mumbai Connection : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या मुंबई कनेक्शनची चौकशी, 4 वेळा केला होता मुंबई दौराVaishnavi Hagawane : सासू नणंदेनं गाडीमध्ये मारलं, त्यांचे पाय धरले,वैष्णवीच्या वडिलांनी फोडला हुंदका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washington Firing : अमेरिकेत ज्यू संग्रहालयाबाहेर गोळीबार, इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; अमेरिकेचा टार्गेट किलिंगचा आरोप
अमेरिकेत ज्यू संग्रहालयाबाहेर गोळीबार, इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू; अमेरिकेचा टार्गेट किलिंगचा आरोप
एखाद्याच्या विचारसरणीसाठी जेलमध्ये टाकू शकत नाही, आम्ही ही प्रवृत्ती पाहत आहोत; न्यायालयाची 'सर्वोच्च' टिप्पणी
एखाद्याच्या विचारसरणीसाठी जेलमध्ये टाकू शकत नाही, आम्ही ही प्रवृत्ती पाहत आहोत; न्यायालयाची 'सर्वोच्च' टिप्पणी
Dhule News : धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड, अनिल गोटेंचा 'तो' आरोप खरा ठरला; पोलिसांनी 102 क्रमांकाची खोली उघडली अन्...
धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड, अनिल गोटेंचा 'तो' आरोप खरा ठरला; पोलिसांनी 102 क्रमांकाची खोली उघडली अन्...
Weather Update : देशात एकाचवेळी भीषण गर्मी अन् मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार; वीज, झाडे कोसळून 24 जणांचा अंत, श्रीगंगानगरमध्ये 47.6 डिग्री तापमान
देशात एकाचवेळी भीषण गर्मी अन् मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार; वीज, झाडे कोसळून 24 जणांचा अंत, 11 होरपळले, श्रीगंगानगरमध्ये 47.6 डिग्री तापमान
Almatti Dam Height : अलमट्टी उंची बाबत 15 दिवसांनी सर्व पक्षीयांसह पुन्हा बैठक; आंदोलक आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून सूचना
अलमट्टी उंची बाबत 15 दिवसांनी सर्व पक्षीयांसह पुन्हा बैठक; आंदोलक आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून सूचना
PM and CM Relief Fund : मानवतेचा शिखरबिंदू! वृद्धाश्रमातील 82 वर्षीय नागरिकाने दिली पंतप्रधान अन् मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 20 लाखांची देणगी
मानवतेचा शिखरबिंदू! वृद्धाश्रमातील 82 वर्षीय नागरिकाने दिली पंतप्रधान अन् मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 20 लाखांची देणगी
MI vs DC IPL 2025 : आयपीएलच्या टॉप-4 संघांवर शिक्कामोर्तब! हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली 'मुंबई इंडियन्स'ची प्लेऑफमध्ये धडक, दिल्ली बाहेर
आयपीएलच्या टॉप-4 संघांवर शिक्कामोर्तब! हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली 'मुंबई इंडियन्स'ची प्लेऑफमध्ये धडक, दिल्ली बाहेर
आयव्हरी हँडलूम बनारसी, मल्टीलेयर पिंक ज्वेलरी अन्  भांगात कुंकू; कान्समध्ये ऐश्वर्याचा शाही लूक PHOTO
आयव्हरी हँडलूम बनारसी, मल्टीलेयर पिंक ज्वेलरी अन् भांगात कुंकू; कान्समध्ये ऐश्वर्याचा शाही लूक PHOTO
Embed widget