एक्स्प्लोर

Ahmednagar News : अकोलेत अजित पवार यांची गाडी अडवत जाब विचारला, शेतकरी नेते दशरथ सावंत यांना ताब्यात घेतल्याचा निषेध

अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अजित पवार आज अहमदनगरला दाखल झाले. परंतु सभास्थळी जाण्यापूर्वी आंदोलकांनी त्यांची गाडी रस्त्यात थांबवून जाब विचारला.

Ajit Pawar : अहमदनगर जिल्ह्यात अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अजित पवार आज अहमदनगरला दाखल झाले. परंतु सभास्थळी जाण्यापूर्वी मधुकरराव पिचड यांच्या शेतकरी विकास मंडाळाचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी रस्त्यात थांबवून जाब विचारला. विधानसभा निवडणुकीत त्यांचं (सीताराम गायकर) धोतर फेडणार अशी भाषणं केली, त्यांच्या प्रचारासाठी तुम्ही कसे आलात? असं आंदोलक म्हणाले. सोबतच शेतकरी नेते दशरथ सावंत यांना ताब्यात घेतल्याचाही निषेध केला. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना हटवले आणि अजित पवार सभास्थळी पोहोचले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत सीताराम गायकर हे मधुकरराव पिचड यांच्या समवेत होते. मात्र आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत सीताराम गायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी अजित पवार अहमदनगरमध्ये आले होते. अकोले इथे सभास्थळी जातानाच पिचड यांच्या शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते आणी भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यात गाडी थांबवत जाब विचारला. "विधानसभा निवडणुकीत सीताराम गायकर यांचं धोतर फेडणार अशी भाषणं केली होती. आम्ही लहामटे यांना मते दिली. मग आज तुम्ही सीताराम गायकर यांच्यासाठी प्रचाराला कसे आलात?" असं आंदोलक म्हणाले. 

अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीतून शेतकरी नेते दशरथ सावंत यांच्या परिवर्तन पॅनलने माघार घेत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीताराम गायकर यांना विरोध म्हणून पाठिंबा दिल्याचे दशरथ सावंत यांनी सांगितलं. दशरथ सावंत म्हणाले की, "जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मी अजित पवार यांच्या शब्दाला मान देऊन माघार घेतली होती. मात्र अगस्ती कारखाना निवडणुकीत सीताराम गायकर यांना नेतृत्व आणि उमेदवारी देऊ नये या अटीवर ही माघार झाली घेतली होती. परंतु दशरथ सावंत यांनी माघार घेण्यासाठी काहीतरी घेतलं असं सीताराम गायकर यांचे समर्थ बोलतात. त्यामुळे प्रचारासाठी येणाऱ्या अजित पवार यांना जाब विचारण्यासाठी मी स्टेजवर जाणार आहे. मला स्टेजवर जाऊ दिले नाही तर तालुक्याला माझे प्रेत दिसेल". 

परंतु अजित पवार यांच्या सभेच्या आधीच पोलिसांनी सकाळीच दशरथ सावंत यांना ताब्यात घेतलं. त्याचा सुद्धा अजित पवार यांच्यासमोर निषेध करण्यात आला. यावेळी पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ आणि भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar news: अमरापूर-शहाजापूर परिसरातील सामाजिक चळवळीचा दीपस्तंभ हरपला; माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे यांचे निधन
अमरापूर-शहाजापूर परिसरातील सामाजिक चळवळीचा दीपस्तंभ हरपला; माजी उपसरपंच बाबासाहेब शिंदे यांचे निधन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
श्री शनि मंदिरातील चौथऱ्यावर भेसळयुक्त तेल; FDA नं नमुने तपासून कारवाई करावी; मंदिर प्रशासनाला निवेदन
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget