एक्स्प्लोर

Gautami Patil : गौतमी पाटीलला मोठा दिलासा, अटी आणि शर्तीनुसार 'या' प्रकरणात जामीन मंजूर

Gautami Patil : विनापरवाना कार्यक्रम करून नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका गौतमी पाटीलवर ठेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

अहमदनगर : नृत्यांगना गौतमी पाटीलला जामीन मंजूर झाला आहे. अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला आहे. विनापरवाना कार्यक्रम करून नियमांचं उल्लंघन केल्यावरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने अटी आणि शर्तीनुसार हा जामीन मंजूर केला आहे.

गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी पाईपलाईन रोडवर गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमासाठी तिने परवानगी घेतली नसल्याचं समोर आलं. विनापरवानगी कार्यक्रम घेत नियमांचं उल्लंघन केल्यामुळे गौतमी पाटीलवर पोलिसांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

गेल्या वर्षी गणपतीच्या दरम्यान रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे नृत्यांगना पाटील हिचा कार्यक्रम घेतल्याबद्दल नगरमधील गणपती मंडळाच्या अध्यक्षांसह गौतमी पाटील आणि तिच्या मॅनेजर विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गणेशोत्सवाच्या काळात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तिच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देऊन परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतरही गौतमीचा कार्यक्रम झाल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

काय आहे प्रकरण?

नगर शहरातील पाईपलाईन रोडवर गुरूवारी सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान आणि एकदंत मित्र मंडळ यांच्यावतीने गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी नाकारली  होती. मात्र तरीही हा कार्यक्रम घेतल्यामुळे पोलिसांनी आता गौतमी पाटील, तिचा स्वीय सहाय्यक अशोक खरात आणि कार्यक्रमाचे आयोजक असलेले मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे, आनंद कैलास नाकाडे, हर्षल किशोर भागवत, यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये रस्त्यात अडथळा निर्माण होईल असा कार्यक्रम घेणे तसेच सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीक्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादवी कलम 188,283,341, 34 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 2,15 आणि ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 चे कलम 3,4 5, 6 आणि मु.पो.का.क 37 (1) (3)/135  प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

 

महत्त्वाच्या बातम्या

जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
Anna Hazare Protest Ahilyanagar:  मौन धरणे आंदोलनादरम्यान अण्णा हजारेंना रडू कोसळलं, विद्यार्थ्यांच्या हातातील पोस्टर पाहताच अश्रू अनावर
मौन धरणे आंदोलनादरम्यान अण्णा हजारेंना रडू कोसळलं, विद्यार्थ्यांच्या हातातील पोस्टर पाहताच अश्रू अनावर
Anna Hazare Letter to PM Modi: 'एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने सरकारची सत्ता जाणार नाही'; अण्णा हजारेंचे पीएम मोदींना खरमरीत पत्र, काय-काय म्हणाले?
'एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने सरकारची सत्ता जाणार नाही'; अण्णा हजारेंचे पीएम मोदींना खरमरीत पत्र, काय-काय म्हणाले?
Shirdi Crime: शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget