एक्स्प्लोर

मोहटा देवीकडं दुष्काळ दूर करण्याचं साकडं, निलेश लंकेंवर स्तुतीसुमनं; पारनेरमध्ये दणक्यात एन्ट्री करत अजितदादांचं धडाकेबाज भाषण

Maharashtra Politics: आधुनिक गाडगे बाबा म्हणून आर.आर आबांची ओळख होती, आता आधुनिक श्रावण बाळ म्हणून आमदार निलेश लंके यांची ओळख असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं.

Ajit Pawar Parner Rally : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) आज पारनेर (Parner) दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवारांनी धडाकेबाज भाषण केलं. संपूर्ण भाषणात अजित पवारांनी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली. तसेच, आधुनिक गाडगे बाबा म्हणून आर.आर आबांची ओळख होती, आता आधुनिक श्रावण बाळ म्हणून आमदार निलेश लंके यांची ओळख असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं. कोरोना काळातील लंकेंच्या कामाचा उल्लेखही अजित पवारांकडून करण्यात आला आहे. त्यासोबतच लंकेंच्या मतदारसंघात  विविध विकासकामं करण्याचं आश्वासन अजित पवारांकडून देण्यात आलं आहे. 

पावसानं ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट : अजित पवार

अजित पवार अहमदनगर दौऱ्यावर असून पारनेरमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी अजित पवार म्हणाले, "पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांवर संकट उद्भवलं आहे. यंदा उजनी धरण फक्त 60 टक्के भरलं आहे, नेहमी 100 टक्के भरलेलं असतं. काही भागांमध्ये धरणं भरली आहेत, तर काही भागांमध्ये परिस्थिती बिकट आहे."

पारनेरसाठी अजित दादांचं मोहटा देवीच्या चरणी साकडं

"नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आमदार निलेश लंके महिलांना देवदर्शन घडवतात. आई मोहटा देवीला राज्यावरील दुष्काळाचं संकट दूर करण्यासाठी साकडे घालतो. माझं आजोळ असल्यानं नगर जिल्ह्याची मला माहिती आहे. दुष्काळी जिल्हा म्हणून अहमदनगरच्या काही तालुक्याची ओळख आहे. दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी देवीकडे प्रार्थना करतो."

आधुनिक श्रावण बाळ म्हणून आमदार निलेश लंके यांची ओळख : अजित पवार 

लोकांच्या आशिर्वादानं मी उपमुख्यमंत्री होतो. येत्या काळात पारनेर तालुक्यात 1500 कोटींची कामं झाल्याचं आम्ही दाखवून देऊ, असं म्हणत निलेश लंके यांच्या भागात विविध विकास कामं करण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आश्वासन दिलं आहे. उद्याच्याला आपली सत्ता नसली तर लोकांना काही घेणं देणं नाही, त्यांना त्यांच्या कामाशी घेणं देणं आहे, आमदार निलेश लंके हा एक जागरूक लोकप्रतिनिधी आहे. आमदार लंकेंच्या कामाची पद्धत पाहून तुम्हालाही तुम्ही निवडलेल्या लोकप्रतिनिधींबाबत सार्थ अभिमान वाटत असेल, असं म्हणत कोरोना काळातील आमदार निलेश लंके यांच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून उल्लेख करण्यात आला. आधुनिक गाडगे बाबा म्हणून आर.आर आबांची ओळख होती, आता आधुनिक श्रावण बाळ म्हणून आमदार निलेश लंके यांची ओळख झाली आहे. 

अजित दादांनी वाचला राज्य सरकारच्या कामाचा पाढा 

'वसा विकासाचा  आणि विचार बहुजनांचा' हे सूत्र राज्यातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम आम्ही करतो. आमदार निलेश लंके यांच्या मतदार संघात निधी देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सरकारकडून क्रीडा क्षेत्रासाठी मदत केली जाणार आहे. विविध पाणी उपसा सिंचन योजनेसाठी निधीची आवश्यकता आहे, तो निधी देण्याचा प्रयत्न करणार. बीओटी तत्वावर बस स्थानक, बाजार समिती, क्रीडा संकुलासाठीच्या निधीकडे आम्ही प्रयत्न करणार आहोत, असंही अजित पवार म्हणाले. 

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पारनेरच्या हंगा इथं दाखल झाले आहेत. अजित पवारांच्या हस्ते 'माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रे'चा  शुभारंभ होणार आहे. अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्याकडून यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी करण्यात आली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ahmednagar District: इकडे सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकरांना झापलं, तिकडे अजित दादांच्या बॅनरवर थोरले पवार झळकले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget