Congress : 'मी कमिटीत नसल्यानं माझ्या काही मित्रांना मोठा आनंद झाला', बाळासाहेब थोरातांची विखे पाटलांवर नाव न घेता टीका
Congress Working Committee : काँग्रेसच्या नव्या वर्किंग कमिटीची नुकतीच झाली आहे यामध्ये काँग्रेसचे जेष्ठ नेत बाळासाहेब थोरात याचं नाव वगळण्यात आलं आहे.
अहमदनगर : 'मी वर्किंग कमिटीमध्ये नसल्यामुळे माझ्या काही मित्रांना मोठा आनंद झाला आहे', असं म्हणत काँग्रेसचे (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर नाव न घेता टीका केली आहे. काँग्रेसच्या नव्या वर्किंग कमिटीमध्ये (Working Committee) महाराष्ट्रातील आठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. पण या यादीमधून काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचं नाव वगळण्यात आलं आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांच्या नावाचा समावेश या वर्किंग कमिटीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांना वर्किंग कमिटीमधून वगळल्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना उधाण आलं आहे.
बाळासाहेब थारोतांचा विखे पाटलांवर निशाणा
काँग्रेसच्या या वर्किंग कमिटीवर अनेक नेत्यांनी टीका टीप्पणी केली आहे. तर काँग्रेसच्या नेत्यांकडूनही या टीकेला चोख उत्तर देण्यात आलं आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी बोलतांना भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, 'काही जणं चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना या गोष्टीचा मोठा आनंद झाला आहे. पण त्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी.'
बाळासाहेब थोरातांनी दिले स्पष्टीकरण
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपण वर्किंग कमिटीमध्ये का नाही याचे स्पष्टीकरण देखील यावेळी दिले आहे. त्यांनी म्हटलं की, 'आमच्या नवीन सदस्यांना या कमिटीमध्ये संधी मिळाली याचा आंनदच आहे. मी विधीमंडळ काँग्रेसचा नेता आहे. त्यामुळे विधीमंडळाच्या नेत्याला बहुमत असेल तर त्याला मुख्यमंत्री देखील होता येते, असं माझं पद आहे. त्यामुळे अशा पदावरील व्यक्ती वर्किंग कमिटीमध्ये जात नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये हा नियम बाजूला ठेवला जातो. यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश नाही. त्यामुळे जेव्हा तुमच्याकडे महत्त्वाचं पद असतं त्यावेळी तुम्ही कमिटीमध्ये नसता.'
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून त्यांची टीम बांधण्यात येत आहे. त्यासाठी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या आठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांची वर्णी या वर्किंग कमिटीसाठी लागली आहे.
राज्यातील 'या' नेत्यांचा वर्किंग कमिटीमध्ये समावेश
महाराष्ट्रातून मुकुल वासनिक, अशोक चव्हाण, महासचिव म्हणून अविनाश पांडे आणि प्रभारी म्हणून रजनीताई पाटील, माणिकराव ठाकरे यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. कायम निमंत्रितांमध्ये चंद्रकांत हंडोरे यांचं नाव आहे. तर विशेष आमंत्रितांमध्ये प्रणिती शिंदे आणि यशोमती ठाकुर यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा :
Congress Working Committee: काँग्रेस वर्किंग कमिटीतल्या नेमणुकांचा महाराष्ट्रासाठीचा अर्थ काय?