Anna Hazare on Wine : ...तर आम्हाला आमच्या मार्गानं जावं लागेल, वाईन विक्रीच्या धोरणावरुन अण्णा हजारेंचा सरकारला इशारा
आताचे सरकार मॉलमध्ये वाईन (Wine) विक्रीचा निर्णय घेतील असं मला वाटत नाही. पण तसं झालं तर आम्हाला आमच्या मार्गानं जावं लागेल असा इशारा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी दिलाय.
Anna Hazare on Wine : मॉल संस्कृती ही आपली नाही. ती विदेशी संस्कृती आली. आताचे सरकार मॉलमध्ये वाईन (Wine) विक्रीचा निर्णय घेतील असं मला वाटत नाही. पण तसं झालं तर नाइलाजास्तव आम्हाला आमच्या मार्गानं जावं लागेल असा इशारा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी दिला आहे. राज्यातील सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा मॉलमध्ये वाईन विक्री सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. यावर अण्णा हजारेंनी प्रतिक्रिया देत सरकारला इशारा दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारनं मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जनतेच्या आणि भाजपाच्या विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. दरम्यान, राज्यातील सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा मॉलमध्ये वाईन विक्री सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. मॉलमधील वाईन विक्री ही शेतकऱ्यांच्या हिताची असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (shabhuraj desai) यांनी दिली आहे. दरम्यान मॉलमध्ये वाईन विक्रीविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आता पुन्हा अण्णांनी सरकारला इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले होते शंभूराज देसाई
मॉलमधील वाईन विक्री ही राज्याच्या आणि शेतकऱ्याचा हिताची आहे, अशी मत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं होतं. मॉलमध्ये वाईन विक्री करावी की नको यासाठी मागील सरकारने लोकांकडून मते मागवली होती. ही मते प्राप्त झाली असून त्याचा अभ्यास सुरु असल्याचे देसाई म्हणाले होते. या धोरणासंदर्भात जनतेकडून मागवलेल्या प्रतिक्रियांचा अभ्यास करुन लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही देसाई यांनी सांगितलं होतं. मागच्या सरकारच्यावेळी मंत्री असताना आम्ही संपूर्ण माहिती भाजप पक्षापर्यंत पोहोचवू शकलो नव्हतो. मात्र, यावेळी या संदर्भातील संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय हा निर्णय घेणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचं हे नवं सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीचा कसा फायदा होईल, याकडे आमचं लक्ष असल्याचे देसाई म्हणाले होते.
मागच्या सरकारच्यावेळी मंत्री असताना आम्ही संपूर्ण माहिती भाजप पक्षापर्यंत पोहोचवू शकलो नव्हतो. मात्र यावेळी या संदर्भातील संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय हा निर्णय घेणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचं हे नवं सरकार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीचा कसा फायदा होईल?, याकडे आमचं लक्ष आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या: