एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार , देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

2019  साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही. मात्र  ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा संपूर्ण पक्ष घेऊन आलो, असे फडणवीस म्हणाले.

अहमदनगरशासन आपल्या दारी(shasan apalya dari) कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मी पुन्हा येईन घोषणेवर भाष्य केलं. 2019  साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही, असं फडणवीस म्हणाले. तसंच, आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार आहे, असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला  आहे. ते शिर्डी येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते. शिर्डीजवळच्या काकडी गावात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजवणी सुरू आहे.  मी म्हणालो होतो मी पुन्हा येईल,अजून देखल त्याची दहशत आहे. 2019  साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही. मात्र  ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा संपूर्ण पक्ष घेऊन आलो. 

हो आहे आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर, पण...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू झाला आहे. दोघांची नजर  उपमुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर अशी टीका केली जाते. यावर फडणवीस म्हणाले, आमची नजर खुर्चीवर आहे मात्र ती  खुर्चीच्या संरक्षणासाठी आहे. कोणी आमच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीकडे कोणी वाकड्या नजरेने कोणी पाहू नये, यासाठी आमचे लक्ष मुख्यमंत्र्याच्या खुर्चीकडे आहे. 

दुबार पेरणीची वेळ आली तर सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही

विकासकामांना पैसा कमी पडणार नाही. मराठवाडा, नगर या भागातील पाण्याचा वाद कायमस्वरूपी संपवायचा आहे. वाहून जाणार पाणी इकडे वळविण्यासाठी लवकरच काम सुरू करतोय. आपल्या शेतकऱ्यांना मजबूत करण्याचं काम करतोय. नमो शेतकरी सन्मान  योजना, एक रुपयात पीक विमा योजना अनेक योजना आणल्या आहे. दुर्दैवाने दुबार पेरणीची वेळ आली तर सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार तुमच्या पाठीशी असणार आहे, असे आश्वासन फडणवीसांनी यावेळी दिले.   

नगर जिल्हा पहिला सौर ऊर्जा असलेला जिल्हा करण्याचे प्रयत्न

 आठ ते बारा तास ग्रामीण भागातील बत्ती गुल असते. त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्यासाठी वणवण होत असते. सतत लाईट जात असल्याने अनेक ग्रामीण भागातील यंत्रणा ठप्प होते. मात्र नगर जिल्हा या त्रासापासून मुक्त होणार आहे. नगर जिल्हा कदाचित पहिला सौर ऊर्जा असलेला जिल्हा होईल या पद्धतीने वेगाने काम सुरु होणार आहे आणि निश्चित वेळेत पूर्ण होणार  असे फडणवीस म्हणाले.  

हे ही वाचा :

 नवाब मलिक कोणता झेंडा हाती घेऊ स्थितीत; अजित पवार गटाने भेट घेताच जयंत पाटील काय म्हणाले?

महत्त्वाच्या बातम्या

Water Storage Of All Maharashtra Dam: राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
E20 ला विरोध करणं म्हणजे आपली पुढची पिढी संपवणे, पाशा पटेल यांच्याकडून इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या निर्णयाचं जोरदार समर्थन
E20 ला विरोध करणं म्हणजे आपली पुढची पिढी संपवणे, पाशा पटेल E20 च्या समर्थनासाठी मैदानात
Ahilyanagar NEET Student Crime News: NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अंकिताने जीवन संपवलं; चिठ्ठी वाचून कुटुंबीयांचा आक्रोश, म्हणाली, दादा, तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ!
NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अंकिताने जीवन संपवलं; चिठ्ठी वाचून कुटुंबीयांचा आक्रोश, म्हणाली, दादा, तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ!
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 
कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर 

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget