एक्स्प्लोर

Ahmednagar : मार्ग झाला, चाचणी झाली, पण उद्घाटना अभावी दहा कोटींची रेल्वे धूळखात पडून 

Ahmednagar News Update : अहमदनगर रेल्वे स्थानकावर दहा डब्ब्यांची रेल्वे अक्षरशः धूळखात पडलीय. ही रेल्वे नगर ते आष्टी या मार्गवर धावणार असून, दोन ते तीन वेळा चाचणी होऊन देखील ही रेल्वे मागील तीन महिन्यांपासून स्थानकावरच उभी आहे.

अहमदनगर : नगर आणि बीड वासियांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेली नगर- आष्टी रेल्वे (Ahmednagar Ashti Railway) उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. 67 किलोमीटर अंतराच्या या रेल्वेची चाचणी होऊन देखील अजूनही रेल्वे सुरू झालेली नाही. दहा कोटी रुपयांचे नगर-आष्टी रेल्वेचे इंजिनसह 10 डब्बे अहमदनगर रेल्वे स्थानकावर धूळखात पडून आहेत.  

अहमदनगर रेल्वे स्थानकावर दहा डब्ब्यांची रेल्वे अक्षरशः धूळखात पडलीय. ही रेल्वे नगर ते आष्टी या मार्गवर धावणार असून, दोन ते तीन वेळा चाचणी होऊन देखील ही रेल्वे मागील तीन महिन्यांपासून स्थानकावरच उभी आहे.

नगर-परळी रेल्वे मार्गाची लांबी 261 किलोमीटर आहे. नगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झालंय. या रेल्वेची चाचणी देखील पूर्ण झाली आहे. परंतु, प्रतक्षात या मार्गावर रेल्वे काही सुरू झाली नाही.  चाचणी पूर्ण झाल्यामुळे मागच्या तीन महिन्यांपासून नगर-आष्टी रेल्वेचे उद्घाटन कधी होणार याविषयी चर्चा होती आहे. तीन वेळा तारीख जाहीर होऊन देखील ही रेल्वे काही सुरू झालेली नाही.
 
नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग कायम बीड जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलाय. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासंदर्भात कायम केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. ही रेल्वे सुरू झाली तर आष्टी आणि नगरच्या शेतकरी , विद्यार्थी आणि नोकरदारांनाही फायदा होणार आहे. मात्र केवळ काही बड्या नेत्यांना उद्घाटनासाठी मुहूर्त मिळत नसल्याने ही रेल्वे सुरू होत नसल्याचे नागरिक सांगतात.

1995 ला नगर-बीड-परळी रेल्वे मार्गला तत्वतः मंजुरी मिळाली होती. मात्र त्यानंतर अनेक वर्षे राजकीय इच्छाशक्ती अभावी या मार्गाचे काम रखडले होते. सध्या या प्रकल्पाची किंमत चार हजार कोटींच्या पुढे गेलीय. नगर आष्टी मार्गही पूर्ण झालाय. पण रेल्वे धावत नाहीय.

महत्वाच्या बातम्या

Bhagat Singh Koshyari Controversy: राज्यपालांचा तात्काळ राजीनामा घ्या; बारामतीच्या माहिती अधिकार कार्यकर्त्याची थेट राष्ट्रपतींकडे लेखी मागणी 

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांच्या मराठी विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी निदर्शने, भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया  

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
'रामा शेट्टी'च्या गावातील 6 दशकांची 'जहागिरदारी' अन् पती -पत्नीच्या हातातील 'गवती चहाचा' जादुई मोह, अमरापूरमध्ये चहाप्रेमींची अजब झुंबड
'रामा शेट्टी'च्या गावातील 6 दशकांची 'जहागिरदारी' अन् पती -पत्नीच्या हातातील 'गवती चहाचा' जादुई मोह, अमरापूरमध्ये चहाप्रेमींची अजब झुंबड
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Embed widget