एक्स्प्लोर

Ahmednagar: अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा गाजणार? सरकारकडून नामांतराच्या हालचाली सुरु

Ahmednagar Naming Issue : मंत्री दीपक केसरकर यांनी अहमदनगरच्या नामांतराबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती दिली होती. याबाबत प्रस्ताव देखील मागवले असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Ahmednagar Naming Issue:  अहमदनगरचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर ( Punyashlok Ahilyadevi Nagar)  करण्याची मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)  यांनी विधानपरिषदेत (Vidhan parishad) केली होती. या मागणीनंतर सरकारने नामांतराच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अहमदनगर महानगरपालिकेच्या(Ahmednagar Mahapalika)महासभेच्या ठरावाची प्रत मागवण्यात आली आहे. यावरून स्थानिक नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

अहमदनगरचे नाव अंबिकानगर करण्याची मागणी शिवसेनेने याआधी केली होती, मात्र त्यानंतर आता भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)  यांनी थेट विधिमंडळात याबाबत मागणी करून सरकारी भूमिका काय? असा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी अहमदनगरच्या नामांतराबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती दिली होती. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रस्ताव देखील मागवले असल्याचे त्यांनी सांगितले होते. शासन स्तरावर आता हालचाली सुरू झाल्या असून जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे तसा ठरावाची प्रत मागवली आहे.

अहमदनगरच्या नामांतराबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी स्पष्ट भूमिका घेतली असली तरी इतर पक्षांनी यावर सावध पवित्रा घेतला आहे. नामांतराने शहराचा आणि जिल्ह्याचा विकास होणार नाही,  आधी विकास महत्वाचा अशी प्रतिक्रिया विविध पक्षाच्या नेत्यांनी घेतली आहे.

शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्याने येत्या काळात हा मुद्दा पुन्हा गाजणार 

याबाबत ठरावाची प्रत मागवल्याने मनपाची महासभा बोलावली जाणार का? या ठरावला स्थानिक नगरसेवक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. अहमदनगरच्या नामांतराबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी जरी विधिमंडळात मागणी केली नसली तरी याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्याने येत्या काळात हा मुद्दा पुन्हा गाजणार असल्याचे चित्र आहे.

अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490 रोजी मलिक अहमद बादशहाने केली. नुकतीच अहमदनगर शहराच्या स्थापनेला 533 वर्ष पूर्ण झाली आहे. मलिक अहमद निजामशहाच्या नावावरुनच अहमदनगर हे नाव पडले आहे.  अहमदनगरचे नाव राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरुन करण्याची मागणी केली असली तरी यापूर्वीच शिवसेनेकडून अहमदनगरचं नाव 'अंबिकानगर' करावी अशी मागणी झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 1995 साली वाडिया पार्क इथे झालेल्या सभेत त्यांनी अहमदनगरचं नाव आजपासून 'अंबिकानगर' झालं असं जाहीर केलं होतं. तेव्हापासूनच शिवसेनेने ही मागणी लावून धरली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प गाझापट्टी ताब्यात घेणार म्हणताच अवघ्या जगाला शाॅक, हमासची सुद्धा प्रतिक्रिया आली!
डोनाल्ड ट्रम्प गाझापट्टी ताब्यात घेणार म्हणताच अवघ्या जगाला शाॅक, हमासची सुद्धा प्रतिक्रिया आली!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडात पण धनंजय मुंडे रुग्णालयात; शस्त्रक्रियेनंतर 5 दिवस आराम करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडात पण धनंजय मुंडे रुग्णालयात; शस्त्रक्रियेनंतर 5 दिवस आराम करणार
Pune News: 20 दिवसांपूर्वी साखरपुडा, 30 व्या वर्षी गळ्याला दोरी, तुकाराम महाराजांच्या वंशजाने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?
20 दिवसांपूर्वी साखरपुडा, 30 व्या वर्षी गळ्याला दोरी, तुकाराम महाराजांच्या वंशजाने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?
Nashik Kumbh Mela : प्रयागराजमधील चेंगराचेंगरीनंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी घेणार विशेष खबरदारी
प्रयागराजमधील चेंगराचेंगरीनंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी घेणार विशेष खबरदारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi Amrutsnan : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाकुंभमेळ्यात अमृतस्नानABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 05 February 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSanjay Raut Delhi : महाकुंभमधील घटनेवर मला बोलू दिलं नाही,माईक बंद केला..-राऊतSuresh Dhas On Santosh Deshmukh : आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प गाझापट्टी ताब्यात घेणार म्हणताच अवघ्या जगाला शाॅक, हमासची सुद्धा प्रतिक्रिया आली!
डोनाल्ड ट्रम्प गाझापट्टी ताब्यात घेणार म्हणताच अवघ्या जगाला शाॅक, हमासची सुद्धा प्रतिक्रिया आली!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडात पण धनंजय मुंडे रुग्णालयात; शस्त्रक्रियेनंतर 5 दिवस आराम करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडात पण धनंजय मुंडे रुग्णालयात; शस्त्रक्रियेनंतर 5 दिवस आराम करणार
Pune News: 20 दिवसांपूर्वी साखरपुडा, 30 व्या वर्षी गळ्याला दोरी, तुकाराम महाराजांच्या वंशजाने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?
20 दिवसांपूर्वी साखरपुडा, 30 व्या वर्षी गळ्याला दोरी, तुकाराम महाराजांच्या वंशजाने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?
Nashik Kumbh Mela : प्रयागराजमधील चेंगराचेंगरीनंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी घेणार विशेष खबरदारी
प्रयागराजमधील चेंगराचेंगरीनंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी घेणार विशेष खबरदारी
Asian Paints : तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट आला, एशियन पेंट्सचा नफा दुप्पट, शेअरमध्ये एका गोष्टीमुळं घसरला,शेअरधारकांकडून विक्री सुरु
एशियन पेंटसच्या तिसऱ्या तिमाहीच्या रिपोर्टनंतर शेअरमध्ये घसरण, एक गोष्ट कारणीभूत, काय घडलं?
Palghar: धक्कादायक! जंगलात शिकारीसाठी गेले, बंदूकीचे ट्रिगर चुकून दाबलं अन् अनर्थ झाला, 60 वर्षीय इसमाचा मृत्यू, मृतदेह तसाच टाकून शिकारी पळाले
धक्कादायक! जंगलात शिकारीसाठी गेले, बंदूकीचे ट्रिगर चुकून दाबलं अन् अनर्थ झाला, 60 वर्षीय इसमाचा मृत्यू
Babanrao Taywade : ठोस पुरावे नसताना राजकीय जीवन संपवण्यात येत असेल तर...; बबनराव तायवाडेंचा अंजली दमानियांना थेट इशारा
ठोस पुरावे नसताना राजकीय जीवन संपवण्यात येत असेल तर...; बबनराव तायवाडेंचा अंजली दमानियांना थेट इशारा
Walmik Karad : मोठी बातमी: वाल्मिक कराडची ED चौकशीची मागणी फेटाळली, याचिकाकर्त्यांना 20 हजारांचा दंड
वाल्मिक कराडची ED चौकशीची मागणी फेटाळली, याचिकाकर्त्यांना 20 हजारांचा दंड
Embed widget