एक्स्प्लोर

Ahmednagar News : नेवासामध्ये रक्षणासाठी धनगर समाजाकडून रास्ता रोको, छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर महामार्गावर तासभर चक्काजाम आंदोलन

Ahmednagar News : धगनर आरक्षणाच्या मागणीवरुन सध्या धनगर समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतयं. राज्य सरकारकडून 50 दिवसांची मुदत देण्यात आली असली तरीही धनगर समाजाकडून आंदोलन सुरुच आहे.

अहमदनगर : धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीवरून राज्य सरकारने (Government) 50 दिवसांची मुदत दिली आहे. पण तरीही  सरकारच्या आश्वासनानंतरही धनगर समाज रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अहमदनगरमधील (Ahemednagar) नेवासे फाट्याजवळ राजमुद्रा चौकात शनिवार (30 सप्टेंबर) रोजी आंदोलन करण्यात आले. चक्काजाम आंदोलन करत धनगर समाजाकडून आरक्षणाची मागणी करण्यात आलीये. दरम्यान धनगर आरक्षणसाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे सुरु असलेले उपोषण 18 दिवसांनंतर मागे घेण्यात आले. 

50 दिवसांत धनगर आरक्षणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येईल. तसेच धनगर समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन राज्य सरकारकडून धनगर समाजाला देण्यात आल्या आहेत. दरम्यान तरीही धनगर समाज हा रस्त्यावर उतरत असल्याचं चित्र सध्या आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर ही महामार्ग धनगर समाजाकडून अडवण्यात आला. तब्बल तासभर धनगर समाजाकडून या रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची मागणी

दरम्यान धनगर समाजाला सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच जर 50 दिवसांत मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आगमी काळामध्ये यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यता येईल. असा इशारा धनगर समाजाकडून देण्यात आला आहे. तब्बल तासभर सुरु असलेल्या या चक्काजाम आंदोलनामध्ये शेकडो धनगर बांधव सहभागी झाले होते. तर या मोर्चातील एका चिमुकलीने धनगर आरक्षणाची मागणी करताना सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

'आमचा आवाज सरकारपर्यंत पोहचत नाही'

मागील विधानसभेत धनगर समाजाचे सात आमदार होते, मात्र यावेळी तेवढी संख्या नसल्यानं आमचा आवाज सरकारपर्यंत पोहचत नसल्याचं यावेळी धनगर समाजाचं म्हणणं आहे. एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या जोर धरत आहे. त्यातच धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील आणखीच तीव्र होत असल्याचं पाहायला मिळतयं. तसेच यामधून सरकार कसा मार्ग काढणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. 

धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. पण  काही दिवसांपूर्वीच नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्त्वात आदिवासी संघटनांची बैठक घेण्यात आली. यात धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देण्याची मागणी होत असून त्या मागणीला पूर्णपणे विरोध असल्याची भूमिका आदिवासी नेत्यांनी यावेळी मांडली. त्यामुळे आता धनगर समाजाच्या मागण्या सरकार पूर्ण करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हेही वाचा : 

Nashik News : 'धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण देऊ नये', नाशिकच्या आदिवासी संघटनांकडून रास्तारोको आंदोलन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget