एक्स्प्लोर

Ahmednagar Crime News:  खळबळजनक! पाथर्डीतील माळीबाभुळगाव येथील विहिरीत आढळले चार मृतदेह

Crime News: पाथर्डीतील माळीबाभुळगाव जवळील एका पोल्ट्री फार्मजवळील एका विहिरीत चार मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Ahmednagar Crime News:  पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव हद्दीतील दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्म शेजारील विहरीत चार मृतदेह आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पाथर्डी येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. नांदेडच्या करोडी येथील धम्मपाल सांगडे हा पत्नी कांचन, एक मुलगा, दोन मुली यांच्यासह दिपक गोळक यांच्या पोल्ट्रीफार्मवर मजुरीचे काम करीत होता. धम्मपालची पत्नी कांचन आणि मुलांचे मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी मयत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. 

धम्मपाल सांगडे आणि त्याची पत्नी कांचन सांगडे, मुलगा निखील सांगडे, मुलगी निषीधा सांगडे, संचिता सांगडे हे पोल्ट्रीफार्मवर राहत होते. धम्मपाल सांगडे आणि त्याची पत्नी कांचन यांच्यात बुधवारी रात्री वाद झाला होता. यावेळी इतरांनी मध्यस्ती करुन वाद मिटविला. रात्र झोपल्यानंतर पुन्हा नवरो बायकोत वाद झाल्याचे शेजारी राहणाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर सकाळी पोल्ट्रीफार्मवर काम करणारा एकजण विहिरीवर मोटार सुरू करायला गेला होता. तेव्हा निषीधा सांगडे हीचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना दिसला. पोल्ट्रीफार्मचे चालक दिपक गोळक यांना माहीती मिळताच त्यांनी पोलिसांत याबाबतची माहिती दिली. 

घटनेची माहिती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत तीस ते पस्तीस फूट पाणी होते. वीज पंपाच्या सहाय्याने पाणी उपसले तेव्हा कांचन सांगडे, निखील सांगडे, संचिता  सांगडे या तिघांचे मृतदेह सापडले. कांचन आणि तिचे तिन्ही मुले विहिरीत मृत अवस्थेत सापडले. पोलिसांनी कांचनचा नवरा धम्मपाल सांगडे याला ताब्यात घेतले आहे. ही हत्या आहे की आत्महत्या? याचा तपास पोलीस करीत आहेत.

अवैध धंद्याची तक्रार केल्याने दोन तरुणांवर तलवारीने वार

अवैध धंद्याची (Illegal Business) पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून दोन तरुणांवर तलावारीने (Sword) वार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये (Ahmednagar) घडली आहे. अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाणे (Kotwali Police Station) हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्याची तक्रार पोलिसांकडे केल्याच्या रागातून काल (19 जून) मध्यरात्री ही घटना घडली. ओंकार भागानगरे असं मयत युवकाचं नाव आहे तर शुभम पाडोळे हा या घटनेत जखमी झाला आहे.

बालिकाश्रम रस्त्यावर रुबाब कलेक्शनसमोर काल मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गणेश हुच्चे याचे कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे सुरु होते. या धंद्यावर कारवाई करण्यासंदर्भात ओंकार भागानगरे या तरुणाने पोलिसांकडे तक्रार केली होती. याच त्याने ओंकार भागानगरे आणि शुभम पाडोळे या दोन तरुणांवर तलवारीने वार केले. या हल्ल्यात ओंकार भागानगरे याचा मृत्यू झाला तर एक शुभम पाटोळे जखमी झाला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget