एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2020 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2020 | मंगळवार
- केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात आणि शेतमालाला हमीभाव न दिल्यास खटला चालवण्याची तरतूद असणारा कायदा आणणार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती https://bit.ly/3f95YLd
- बाळासाहेबांचं स्मारक सर्वांसाठी कधी खुलं होणार? शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनाला मनसेचा सवाल https://bit.ly/3nvxghD बाळासाहेबांची साथ सोडणाऱ्यांनी बोलू नये, संजय राऊतांचं प्रत्युत्तर https://bit.ly/36JIB75
- ऊर्जा मंत्र्यांकडून वाढीव वीजबिलाचं खापर केंद्राच्या डोक्यावर, केंद्राने वेळेत मदत न केल्यानं अडचणी, नितीन राऊतांची केंद्रावर टीका https://bit.ly/2H9sgQl तर तीन पक्षांच्या श्रेयवादाच्या लढाईत वीज बिल माफी अडली, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा केंद्र सरकारवर आरोप https://bit.ly/3f970a3
- चार हजार भाविकांची मर्यादा संपल्यानं तुळजाभवानी मंदिराचा दर्शन गेट पास बंद, संतप्त भाविकांचा गोंधळ, तर शिर्डीत दर्शनावेळी भक्तांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा https://bit.ly/32PMtSM
- औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत रमेश पोकळेंची बंडखोरी, भाजपच्या डोकेदुखीत वाढ, जयसिंगराव गायकवाडांकडून राष्ट्रवादीला मदत करणार असल्याची घोषणा https://bit.ly/38Oqob5
- कोणतीही लस कोरोनावर पूर्णपणे मात करू शकत नाही, WHO च्या प्रमुखांचा इशारा https://bit.ly/35Ic6qR
- दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात यश, जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक https://bit.ly/35BCfr2
- उत्तर प्रदेशच्या भाजप खासदार रीटा बहुगुणांच्या नातीचा फटाक्यामुळं मृत्यू, कपड्यानं पेट घेतल्यानं 6 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत, सर्व पालकांना सतर्क करणारी घटना https://bit.ly/3fe1JOr
- ‘लव जिहाद’ विरोधात मध्यप्रदेशात होणार कायदा, खटला दाखल करून दोषींना पाच वर्षांपर्यंत कडक शिक्षा https://bit.ly/38QGGjW
- 'कालीन भैया' म्हणतात, "आता बस झाल्या गँगस्टरच्या भूमिका", आता वेगळ्या प्रकारच्या भूमिकांमध्ये दिसणार अभिनेते पंकज त्रिपाठी! https://bit.ly/3nwSRGx
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement