एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मे 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मे 2020 | शनिवार
- नियोजित वेळेच्या दोन दिवस आधीच केरळात मान्सून दाखल झाल्याचं स्कायमेटकडून जाहीर, 1 जून रोजी मान्सून दाखल होणार असल्याचा हवामान खात्याने व्यक्त केला होता अंदाज https://bit.ly/2zALYRt
- दहा दिवस कोरोनाचे उपचार घेऊन घरी परतल्यावर चार तासात पोलिसाचा मृत्यू, वांद्रे पोलीस स्टेशनमधील हवालदार दिपक हाटे यांच्या मृत्यूनं मोठा धक्का https://bit.ly/2zNtbSK
- नगरसेवकांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं नागपूर आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दावा, कोरोनाच्या परिस्थितीवरून आयुक्त विरूद्ध सर्वपक्षीय वाद शिगेला https://bit.ly/2XhKDrO
- माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याकडून कौटुंबिक वाद चव्हाट्यावर, यू ट्यूबवर दोन व्हिडीओ पोस्ट करुन सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप https://bit.ly/3chHCMe
- सोशल डिस्टन्सिंगसाठी केरळच्या 'छत्री पॅटर्न'चं पुण्याच्या मंचरमध्ये अनुकरण ठरलं फायदेशीर, महिलांचं घरोघरी जाऊन छत्री वापरण्याचं आवाहन https://bit.ly/3ewN4w5
- “या परिसरात पुन्हा दिसलात तर हातपाय तोडू”, अकोल्यात तरुणांची पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना धमकी, पोलीस दारु पिऊन आल्याचा तरुणांचा आरोप https://bit.ly/2ZRdjJR
- धुळ्यातील बोरकुंड गावात आणि रत्नगिरीतील निवळीमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ, भरवस्तीत बिबट्यांच्या वावराने ग्रामस्थ दहशतीत https://bit.ly/2MdREmV तर नाशिकच्या इंदिरानगरमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन जण जखमी https://bit.ly/36L83sy
- मुंबई लोकल सुरू झाल्या तरी 62 टक्के मुंबईकर किमान दोन-तीन महिने लोकलने प्रवास करणार नाहीत, एम इंडिकेटर अॅपचा सर्व्हे https://bit.ly/2XIAOlv
- चीनसोबतचा वाद चर्चेतून लवकरच मिटेल, संरक्षणमंत्र्यांचा दावा, भारताला युद्ध नको, पण कुणी घाबरवूही शकत नाही, एबीपी न्यूजवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा https://bit.ly/2zK1MkO
- कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचं कठोर पाऊल, जागतिक आरोग्य संघटनेशी संबंध तोडल्याची घोषणा, WHO चीनच्या कलाने काम करत असल्याचा आरोप https://bit.ly/2ZNnD5z
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
पुणे
धुळे























