एक्स्प्लोर
महाराष्ट्राचे पैलवान अभिजीत कटके आणि सोनबा गोंगाणे भारतीय संघात

मुंबई : महाराष्ट्राचा सुपर हेवीवेट पैलवान अभिजीत कटकेने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत भारताच्या 23 वर्षांखालील संघात स्थान मिळवले आहे. हरयाणातल्या सोनीपतमध्ये आयोजित राष्ट्रीय निवड चाचणीत अभिजीतने 125 किलो वजनी गटात स्थान मिळवले आहे. तर महाराष्ट्राच्याच सोनबा गोंगाणे याने 61 किलो वजनी गटात सर्वोत्तम ठरण्याचा मान मिळवला. तसेच उत्कृष्ट कामगिरीच्या निकषांवर या दोघांची 23 वर्षांखालील वयोगटातील आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. येत्या 21 ते 24 मार्च या कालावधीत मंगोलियातल्या उलन बटोरमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अभिजीत कटके हा मूळचा पुण्याच्या शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे. त्याने 2017 साली महाराष्ट्र केसरी किताबाचा मान मिळवला होता. 2018 साली अभिजीतने 23 वर्षांखालील वयोगटाच्या राष्ट्रीय कुस्तीत सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. पण 2018 सालच्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या कुस्तीत त्याला बाला रफिक शेखकडून हार पत्करावी लागली होती. पण त्या पराभवाने निराश न होता अभिजीत 125 किलो वजनी गटाच्या राष्ट्रीय निवड चाचणीत सर्वोत्तम ठरला आहे. सोनबा गोंगाणे हादेखील 61 किलो वजनी गटात महाराष्ट्राचा नावाजलेला पैलवान आहे. तो सेनादलाच्या सेवेत आहे. पुण्यात झालेल्या मातीतल्या पहिल्या राष्ट्रीय कुस्तीत सोनबा गोंगाणे हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. सोनबा हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातल्या निगवे खालसा गावचा आहे.
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















