(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Covid Update : 13 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू, जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 459 वर
शुक्रवारी नागपूर जिल्ह्यात 65 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यात शहरातील 46 तर ग्रामीणमधील 19 जणांचा समावेश आहे. तसेच एकूण सक्रिय बाधितांपैकी 13 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागपूरः जिल्ह्यात दिवसभरात आज 80 कोरोना बाधितांची नोंद झाली. यामध्ये 19 ग्रामीण भागातील तर 61 बाधित नागपूर शहरातील आहेत. यासह शहरातील सक्रिय बांधितांचा आकडा 459वर पोहोचला आहे. दुसरीकडे आज जिल्ह्यात 65 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यात शहरातील 46 तर ग्रामीणमधील 19 जणांचा समावेश आहे. एकूण बाधितांपैकी 13 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी 6 रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालय, 2 रुग्ण मेडिट्रीना हॉस्पिटल, 3 रुग्ण किंग्सवे हॉस्पिटल, 1 रेल्वे रुग्णालय आणि 1 रुग्ण सनफ्लावर रुग्णालयात उपचार घेत आहे. तर उर्वरित 446 बाधित गृहविलगीकरणात आहेत.
शनिवारी मनपा केन्द्रांमध्ये केवळ कोर्बेव्हॅक्स उपलब्ध
नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांवर आता दिवसनिहाय वेगवेगळी लस देण्यात येत आहे. त्यामुळे शनिवारी 2 जुलै, 2022 रोजी मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर केवळ कोर्बेव्हॅक्स लस उपलब्ध राहणार आहे. लस सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल. तसेच लस घेण्यासाठी जाताना सोबत नोंदणी केलेला मोबाईल आणि ओळखपत्र बाळगावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेले आहे. मनपा केन्द्रात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तथा आरोग्य सेवकांना बुस्टर डोज दिल्या जाईल. तसेच 18 ते 59 वर्ष वयोगटातील नागरिकांना खाजगी रुग्णालयात बुस्टर डोज शासकीय दराप्रमाणे दिल्या जाईल.
मनपाच्या सर्व दहा झोनमधील केंद्रांवर लस
मनपाच्या झोन क्र. 1 लक्ष्मीनगर झोन, झोन क्र. 2 धरमपेठ झोन, झोन क्र. 3 हनुमाननगर झोन, झोन क्र. 4 धंतोली झोन, झोन क्र. 5 नेहरूनगर झोन, झोन क्र. 6 गांधीबाग झोन, झोन क्र. 7 सतरंजीपुरा झोन, झोन क्र. 8 लकडगंज झोन, झोन क्र. 9 आशीनगर झोन, झोन क्र. 10 मंगळवारी झोन या सर्व झोनमदील केंद्रांवर लसीकरण उपलब्ध आहे.