एक्स्प्लोर

'दृश्यम 2' प्रदर्शित झाल्यानंतर काहीच तासात Tamilrockers पायरसी वेबसाईटवर लिक

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आला, चित्रपटगृह बंद झाली त्यामुळे अनेकांनी ऑनलाईन सिनेमे पाहणं पसंत केलं. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद पाहता मागील एका वर्षात मोठ्या प्रमाणात सिनेमे अॅप्सवर लॉंच केले गेले. दृश्यम 2 देखील त्यापैकी एक, मात्र याचा दुष्परिणाम म्हणजे हा चित्रपट रिलीज झाल्यावर काहीच तासांमध्ये तामिळरॉकर्स या पायरसी वेबसाईटवर हा चित्रपट लिकही झाला.

मुंबई : दिग्दर्शक जीतू जोझेफचा 'दृश्यम 2' हा चित्रपट जबरदस्त चर्चेत आला आहे. हा चित्रपट नुकताच अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आणि रिलीज झाल्यानंतर काही तासातच लिकही झाला. तमिळरॉकर्स या सोशल साईटवर हा लिक झाला आहे. पायरसी साइट तामिळरोकर्ससोबत इतर अनेक अ‍ॅप्सवरही हा प्रसारित केला जात आहे.

पायरसीवर कडक बंदी असूनही तामिळरॉकर्स तसेच इतर पायरसी साइट्स अद्यापही सक्रीय आहेत. चित्रपट प्रदर्शित होताच अगदी काही तासांमध्ये मोठे चित्रपट यावर लिक केले जातात. केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलीवूडचे सर्व चित्रपट या माध्यमांवर लिक झाले आहेत. यामुळे निर्मात्यांना बरंच नुकसान सहन करावं लागत आहे. साऊथ इंडियन सिनेमातील बहुप्रतिक्षित चित्रपट 'दृश्यम 2' ची लिक होण्यात तामिळरॉकर्ससोबत तामिळगुणसारख्या पायरसी वेबसाइटचाही हात असल्याचं समोर आलंय.

'दृष्यम 2' हा चित्रपट 19 फेब्रुवारी रोजी अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आणि काही तासातच तो पायरसीचा बळी पडला. चित्रपटगृहात प्रदर्शित न करता थेट डिजिटल प्लॅटफ़र्मवर हा चित्रपट रिलीज केला गेला. मात्र पायरसीमुळे या चित्रपटाच्या कमाईवर मोठ्या प्रमाणात फरक पडण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram
 
A post shared by Mohanlal (@mohanlal)

  रिलीजपूर्वी दृश्यम 2 चे स्टार मोहनलाल या चित्रपटाबाबत फार उत्सुक होते. या चित्रपटातील मुख्य पात्र जॉर्जकुट्टी हे सर्वांना आकर्षित करणारं पात्र ठरलंय. एखादी व्यक्ती, सामान्य माणूस आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबाच्या संरक्षणासाठी कोणतीही पातळी गाठू शकतो हे या पात्राद्वारे दिसून येतं. दृश्यमचा पहिला भाग, बॉलिवूड रिमेक हा निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता. अजय देवगण आणि तब्बू यांच्या भूमिकेने आणि या चित्रपटाच्या कथेने सर्वांना विचारात पाडलं होतं. त्यामुळे दृश्यमचा बॉलिवूड रिमेक पाहिलेल्या प्रेक्षकांनाही आता दृश्यम 2 पाहणं फार औत्सुक्याचं ठरतंय.

पिंपरीतील सावकाराची बापलेकाकडून दृश्यम स्टाईल हत्या

पुण्यात 'दृश्यम' पाहून सख्ख्या चुलत भावाची हत्या!

'दृश्यम' फेम श्रिया सरनची अवॉर्ड सोहळ्याला हजेरी

मुलीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी युवकाची 'दृश्यम'स्टाईल हत्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi News

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Vasant More: तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
तुम्ही प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केलाय, वसंत मोरेंविरोधात वंचित आक्रमक, पुण्यात मोर्चा काढणार
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यात शिबिरांचं आयोजन, पात्र भगिनिंना लाभ मिळणार : जिल्हाधिकारी  
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
विमा कंपनीनं 70 टक्के नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दावे फेटाळले, आज संध्याकाळपर्यंत उत्तर द्या अन्यथा....शेतकरी आक्रमक
Embed widget