एक्स्प्लोर

मुलीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी युवकाची 'दृश्यम'स्टाईल हत्या

आपल्या मुलीच्या मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या पोलिसपुत्रांची हत्या फिल्मी स्टाईलनं केल्याचा प्रकार बेळगाव जिल्ह्यातील निप्पानी परिसरात घडला आहे. या गुन्ह्याचा तपास सांगली, कोल्हापूर आणि निप्पानी पोलिस संयुक्तरित्या करत आहेत. या प्रकरणी निप्पानी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे.

कोल्हापूर : आपल्या मुलीच्या मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या पोलिसपुत्रांची हत्या फिल्मी स्टाईलनं केल्याचा प्रकार बेळगाव जिल्ह्यातील निप्पानी परिसरात घडला आहे. या गुन्ह्याचा तपास सांगली, कोल्हापूर आणि निप्पानी पोलिस संयुक्तरित्या करत आहेत. या प्रकरणी निप्पानी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे. दृश्यम चित्रपटात मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाची हत्या करुनही अजय देवगण आणि त्याचे कुटुंबीय पोलिसांना सापडत नाहीत. हाच प्रयत्न सांगली जिल्ह्यातील कुपवाडच्या नगरकर कुटुंबानं केला. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीनं दोन दिवसात आरोपींना जेरबंद केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील शब्बीर बोजगर पोलीस विभागात काम करतात. त्यांचा मुलगा शाहरुख बोजगरचा कर्नाटकातील हणबरवाडी इथं 11 जुलैला निर्घृण खून झाला. शाहरुख याचे सांगलीतील एका युवतीशी प्रेमसंबंध होते. पण त्या मुलीचं लग्न झाल्याची बातमी शाहरुखला कळाली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. त्यातून मुलीनं सहा महिन्यापूर्वी आत्महत्या केली. आपल्या मुलीनं शाहरुखच्या भांडणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा राग रवींद्र नगरकर यांना आला. त्यानंतर वडिलांनी आपली दोन मुलं सुमीत आणि रोहितसह मिळून शाहरुखची हत्या करण्याचा प्लान केला. शाहरुखला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी मुलीच्या एका भावानं सोशल मीडियावर फेक अकाऊंट उघडलं. शाहरुखशी चॅटिंग सुरु केलं. त्यातून मैत्रीचे संबंध वाढवले आणि हणबरवाडीला बोलावलं. 11 जुलै रोजी बापलेकांनी एका साथीदारासह शाहरुखचा काटा काढला. दृश्यम चित्रपटातील नायकानं आपल्या मुलीला छेडणाऱ्याची हत्या लपवून ठेवली, पुरावे नष्ट केले. पण हा चित्रपट होता. प्रत्यक्ष जीवनात आरोपी काही ना काही चूक करतो आणि तंत्रज्ञानाच्या युगात पुरावेही मिळतात. त्यामुळे आरोपी कितीही चतुर असला तरी कानून के हात लंबे होते है हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका

Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Embed widget