Amitabh Bachchan | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला अमिताभ बच्चन गैरहजर राहणार
तापाने आजारी आहे असल्याने डॉक्टरांनी प्रवास करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाऊ शकत नसल्याचं अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करुन सांगितलं.
मुंबई : नवी दिल्लीत पार पडणाऱ्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला महानायक अमिताभ बच्चन अनुपस्थित राहणार आहेत. तब्येत खराब असल्याने आपण या सोहळ्याला गैरहजर राहणार असल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरुन दिली. तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहता येणार नाही याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली आहे. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे.
तापाने आजारी असल्याने पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाऊ शकत नसल्याचं अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करुन सांगितलं. तापामुळे डॉक्टरांनी त्यांना प्रवास करण्यास मनाई केली असून आराम करण्याचा सल्ला दिला आहे. यासंबंधीचं ट्वीट बिग बींनी रविवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी केलं आहे. त्यानंतर ही बातमी सोशल मीडियावर पसरताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांची तब्येत लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना सुरु केली.
अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत म्हटलं की, ताप आला आहे... प्रवास करण्याची परवानगी नाही... दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सहभागी होऊ शकत नाही... अत्यंत दुर्दैवी आहे... मला याचं दु:ख होत आहे!
T 3584/5/6 - Down with fever .. ! Not allowed to travel .. will not be able to attend National Award tomorrow in Delhi .. so unfortunate .. my regrets ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 22, 2019
अमिताभ बच्चन यांना राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलं जाणार होतं. दादासाहेब फाळके पुरस्कार हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च सरकारी सन्मान आहे. सुवर्णकमळ, शाल आणि दहा लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी शूटिंगदरम्यान आपल्या वाढत्या वयाचा उल्लेख केला होता. त्यानंतर बिग बींच्या आजारपणाची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चिंता होता.
संबंधित बातम्या