Mufasa: The Lion King Review: तीन खान्सची कमाल, शाहरुखच्या आवाजात Mufasa ची धमाल!
Mufasa: The Lion King Review: शाहरुख खान आणि त्याची दोन्ही मुलं. आर्यन आणि अब्राहम खान. भारतात डिज्नीचे चित्रपट पाहण्यासाठी एक कारण हेच आहे, कारण मुलांचं फुल्ल ऑन एन्टरटेन्मेट करणारी ही फिल्म आहे.
Barry Jenkins
Voice Artist : Shah Rukh Khan, Aryan Khan, Abram Khan, Shreyas Talpade
Theaters
Mufasa: The Lion King Review: जेव्हा तीन खान्सचा विषय येतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर शाहरुख, सलमान आणि आमिर असे तीन खान्स येतात. पण, या फिल्ममध्येही तीन खान्स आहेत, ज्यांनी खूप कमाल केली आहे. हे खान्स... बॉलिवूडचे खान्स नाहीत... तर हे खान्स आहेत... किंग खान शाहरुख खान आणि त्याची दोन्ही मुलं. आर्यन आणि अब्राहम खान. भारतात डिज्नीचे चित्रपट पाहण्यासाठी एक कारण हेच आहे, कारण मुलांचं फुल्ल ऑन एन्टरटेन्मेट करणारी ही फिल्म आहे. पण फक्त मुलांचंच नाहीतर, थोरामोठ्यांचंही मनोरंजन करणारी ही फिल्म आहे.
चित्रपटाचं कथानक
लहानपणी Lion King आपण सर्वांनीच पाहिलं आहे. काही दिवसांपूर्वी या कार्टुन स्टोरीवर सिनेमाही आला होता. यावेळी Lion King मधल्या एका पात्रावर आधारीत स्टोरी आहे. ते पात्र म्हणजे, Mufasa. या सिनेमात Mufasa जंगलाचा राजा कसा बनतो, याची स्टोरी दाखवण्यात आली आहे. The Lion King च्या फर्स्ट पार्टमध्ये Mufasa आणि त्याचा भाऊ Scar ची दुश्मनी पाहायला मिळाली होती. पण, या सिनेमात कथानक काहीसं भूतकाळात जाणार आहे. Mufasa लहान असताना जंगलात पूर येतो आणि त्या पुरामुळे तो आपल्या कुटुंबापासून विभक्त होतो. त्यानंतर एकटा पडलेला Mufasa सिंहांच्या दुसऱ्या कळपात जातो. त्या कळपासोबत तो राहू लागतो. तिथे त्याचा एक मानलेला भाऊ भेटतो. त्यानंतर मग घुसखोर कसे त्यांच्या कुटुंबाला मारतात आणि त्यांच्या जीवावर बेततात. तिथून पळून गेल्यावर त्यांना एक नवी जागा सापडते, ज्याबद्दल कोणालाच माहिती नसतं, ते तिथे राहू लागतात. पुढे, जसजसे ते दोघे मोठे होतात. दोघांमधील शत्रुत्व वाढतं... हेच या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.
कसा आहे चित्रपट?
डिज्नेनं Mufasa हा सिनेमा अत्यंत सुंदरपणे रुपेरी पडद्यावर साकारला आहे. Visuals तर डोळ्यांचं पारणं फेडणारे आहेत. तसेच, याच्या वॉईस ओव्हरबाबत बोलायचं झालं तर, कमाल आहे. वॉईस ओव्हर करताना पूर्णपणे देसी अंदाज देण्यात आला आहे. काही सीक्वेन्स फारच कमाल आहेत. मोठ्या पडद्यावर डिज्नीनं साकारलेले Visuals फारच भारी दिसतात. मध्येच काही सीन्स खूपच मोठे आणि बोरिंग लागतात. पण, ते तेवढ्या पुरतंच. फर्स्ट हॉफ तर फारच कमाल. सेकंड हाफमध्ये सिंहांचा लव्ह ट्रँगल फारच फनी वाटतो. पण, तुम्ही हसत खेळत ते पाहता. कंटाळा येत नाही.
तीन खान्सचा व्हॉईस ओव्हर...
या चित्रपटात कमालची वाईस एडिटिंग करण्यात आली आहे. Mufasa चा आवाज शाहरुख खाननं दिला आहे. किंग खानच्या आवाजानं सिंहला रोमॅन्टिक बनवलं आहे. जेव्हा शाहरुखच्या आवाजात मुफासा म्हणतो की, मैं हू ना... त्यावेळी डोळ्यांसमोर शाहरुख आणि सुष्मिता सेनचा सीन आपोआप दिसतो. Mufasa चा मुलगा सिम्बाचा आवाज आर्यन खाननं दिला आहे आणि त्याचा आवाज ऐकून स्पष्ट होतं की, त्यानं वॉईस अॅक्टिंगची प्रॉपर ट्रेनिंग घेतली आहे. आर्यननं आपलं काम परफेक्शननं केलं आहे. छोट्या Mufasa ला शाहरुखच्या छोट्या अब्राहमनं आवाज दिला आहे. एक म्हण आहे की, बाळांचे पाय पाळण्यात दिसतात. तसंच काहीसं, मुफासामध्ये आर्यन आणि अब्राहमचा वॉईस ओव्हर ऐकून वाटतं. दोघांचेही आवाज कॅरेक्टर्सना सूट करतात. तर, श्रेय तळपदेनं Timon चा आवाज दिला आहे. तर, संजय मिश्रानं Pumbaa ला आवाज दिला आहे. या दोघांची जुगलबंदी भारी आहे, मकरंद देशपांडेनं Rafiki चा आवाज दिला आहे. मियांग चँगनं टाकाला आपला आवाज दिला आहे.
दिग्दर्शन : Barry Jenkins चं दिग्दर्शन उत्तम आहे, त्यांनी स्टोरी फारच सिम्पल ठेवली आहे, वॉईस कास्टिंगवर उत्तम काम केलं आहे.
एकूणच, मुलांसोबत हा चित्रपट पाहता येऊ शकतो.