Mann Kasturi Re Movie Review: 'मन कस्तुरी रे'; फसलेली टिपिकल लव्ह स्टोरी
संकेत माने (Sanket Mane) दिग्दर्शित 'मन कस्तुरी रे' हा सिनेमा 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कसा आहे हा सिनेमा? जाणून घेऊयात...
संकेत माने
अभिनय बेर्डे, तेजस्वी प्रकाश, वीणा जामकर, राजश्री देशपांडे
Mann Kasturi Re Movie Review: बॉलिवूडची टिपिकल लव्ह स्टोरी, सिनेमाचा हिरो मुंबईच्या चाळीत राहणारा. तीन मित्रांसोबत इव्हेंट कंपनी मध्ये वेटरचं काम करणारा,
त्याची आई चार घरी काम करून त्यासोबत सुखी आयुष्याची गोड स्वप्नं पाहणारी, त्याचं शिक्षण कॉलेज लाईफ आणि वेटरचं काम सारं काही सुरळीत,मजा मस्तीत सुरू असताना अचानक तुलनेनं गर्भश्रीमंत बिल्डर पापा की परी,रॉकस्टार बबली गर्लची इन्ट्री हिरोच्या आयुष्यात होते. तिच्या वडिलांनी तिला श्रीमंत मुलाचं स्थळ पाहिलेलं असतं आणि मग या चित्रपटात ट्विस्टची मालिका सुरू होते. सिनेमाचा हिरो कोर्ट कचेरीत अडकतो. पुढं काय होतं ते सिनेमा पाहायला गेलात तर कळेलच.
मन कस्तुरी रे (Mann Kasturi Re)सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर खरं कौतुक दिग्दर्शक संकेत माने याचं करावं वाटतं, संकेतचा हा पहिला सिनेमा ज्या धाटणीचा बनवलाय यामागे त्याचा आजवरच्या कामाच्या अनुभवाची छाप नक्की पडलेली दिसतेय. अनेक चित्रपटांत सहाय्यक दिग्दर्शक, लेखक अश्या धुरा त्याने सांभाळल्या असल्याने या सिनेमात त्याने कोणतीही कसर सोडलेली दिसत नाही. संकेत माने (Sanket Mane) दिग्दर्शित 'मन कस्तुरी रे' हा सिनेमा 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाचं मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे 'बिग बॉस 15 ची विजेती आणि करण कुंद्रा सोबतच्या नात्यामुळे चर्चेत असलेली बबली गर्ल तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash), सिनेमाची सुरुवात ज्या गतीने होते कथानक पुढं जातं त्यातच अनावश्यक गाणी आणि त्यांचं संगीत हे सुरू असलेल्या कथेत व्यत्यय ठरत होतं. तेजस्वीला अभिनयाची कसर ही बऱ्यापैकी 4-5 सिनेमांच्या अनुभवांची पुंजी जवळ असलेल्या अभिनेता अभिनयच्या समोर तेजस्वीला चांगलीच कसरत करावी लागली. मात्र दोघांचा रोमान्स, केमिस्ट्री बिलकुल जुळून आलेली नाही, इंटर्व्हल नंतर सिनेमा प्रचंड संथ होतो आणि तेजस्वीचा अभिनय त्यानंतर खुललेला पाहायला मिळाला. तसं पाहिलं तर तसं पाहिलं तर अभिनेता अभिनय बेर्डे (Abhinay Berde) आजवर लक्षात राहिलाय तो त्याच्या 'ती सध्या काय करते' मधील भुमिकेमुळेच... त्यानंतर त्याचे आलेले इतर सिनेमे आणि त्यातील अभिनय प्रेक्षकांच्या विस्मरणात गेलेत, तसंच या कस्तुरीचा सुगंध सुद्धा फार काळ टिकेल असं वाटत नाही.
तेजस्वीचा पहिला मराठी सिनेमा आहे त्यामुळेच बॉलिवूड च्या गल्ली मध्ये या सिनेमाची चर्चा जोरदार पाहायला मिळाली, नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा पार पडला यात तेजस्वी चे आई वडील आणि करणचे वडील देखील हजर होते.
मुख्य भूमिकेत बरीच स्टारकास्ट आहे भरपूर सस्पेन्स आणि ट्विस्ट या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बॅकग्राऊंड स्कोर, सिनेमॅटोग्राफी, आर्ट डिपार्टमेंट ने उत्तम काम केलंय. मात्र सिनेमाचा आत्मा वेगवेगळ्या गुंत्यात गुंतून गेल्यावर कथेचा शेवट हा मिस्ट्री वाला असेल अशी अपेक्षा होती मात्र सिनेमाचा शेवट निराशाजनक ठरला.
मी या सिनेमाला देतोय 2.5 स्टार!