एक्स्प्लोर
A Suitable Boy: दोन प्रेम कथा, एक शेवट; लता आणि मानची गोष्ट
लता मेहरा आणि मान कपूर यांच्या आयुष्यातील घडामोडी 'अ सुटेबल बॉय' (A Suitable Boy) या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.
अ सुटेबल बॉय
Romance, Drama
Director
मीरा नायर
Starring
तब्बू, ईशान खट्टर, तान्या
A Suitable Boy: मेहरा आणि कपूर कुटुंबाची गोष्ट 'अ सुटेबल बॉय' (A Suitable Boy) या वेब सीरिजमध्ये मांडण्यात आली आहे. या सीरिजची कथा लता मेहरा आणि मान कपूर या दोन भूमिकेंच्या अवतीभोवती फिरते. लता ही मेहरा कुटुंबात लाडानं वाढलेली तरुणी तर मान हा एका मंत्र्यांचा मुलगा. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशामधील राजांच्या जमिनीवर तेथील लोकांचा हक्क असावा, यासाठी मान कपूरचे वडिल म्हणजेच महेश कपूर हे लढत असतात. महेश कपूर यांच्या प्रमाणेच मान देखील कपूर घराण्याचा वारसदार म्हणून राजकारणात येईल, अशी अपेक्षा कपूर कुटुंबाची असते. तर दुसरीकडे लता ही कॉलेजमध्ये शिकत असते. लताच्या आईची इच्छा असते की, लताचं लग्न एका 'सुटेबल बॉय' सोबत व्हावं.
'अ सुटेबल बॉय' च्या कथेच्या सुरुवातीला असं दिसतं की, कपूर आणि मेहरा कुटुंबाच्या घरातील एका कार्यक्रमामध्ये सईदाबाई ही गाणं म्हणायला येते. या कार्यक्रमामध्ये सईदाबाई आणि मान यांची पहिल्यांदा भेट होते. सईदाबाईचं गाणं ऐकून मान तिच्या प्रेमात पडतो. त्यानंतर मान हा सईदाबाईच्या घरी जाण्यास सुरुवात करतो. तर दुसरीकडे लता ही कॉलेजमधील मुस्लिम तरुणाच्या प्रेमात पडते. लताची त्या तरुणासोबतची प्रेमकथा आणि सईदाबाई आणि मानची लव्ह स्टोरी मेहरा आणि कपूर कुटुंबाला मान्य नसते. आता लता आणि मानच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटना घडण्यास सुरुवात होते.
मान हा सईदाबाईच्या घरी अनेकवेळा जात असतो. मान आणि सईदाबाईबद्दल जेव्हा मानच्या वडिलांना कळते, तेव्हा ते मानला घराबाहेर काढतात. सईदाबाईच्या बहिणीला उर्दू भाषा शिकवण्यासाठी एक तरुण सईदाबाईच्या घरी येत असतो. त्याच तरुणाच्या गावी जाण्याचा निर्णय मान घेतो. तर दुसरीकडे लता ही तिच्या कॉलेजमधील मुस्लिम तरुणाच्या प्रेमात पडली आहे, हे तिच्या आईला कळते. त्यानंतर लता आणि मान यांच्या आयुष्यात काय घडतं? लताला तिचा सुटेबल बॉय भेटतो का? मान त्याच्या घरी परत येतो का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला नेटफ्लिक्सवरील अ सुटेबल बॉय नावाची वेब सीरिज बघावी लागेल. या सीरिजमधील कलाकारांचा अभिनय, सीरिजमधील दाखवण्यात आलेला सेट आणि कथानक या सर्वगोष्टींसाठी ही सीरिज तुम्ही पाहू शकता.
स्टार कास्ट:
सुटेबल बॉय या सीरिजमधील सईदाबाई ही भूमिका अभिनेत्री तब्बूनं साकारली आहे. तर मान कपूर ही भूमिका ईशान खट्टरनं साकारली आहे. सीरिजमध्ये लता नावाच्या तरुणीची भूमिका अभिनेत्री तान्यानं साकारली आहे.
House Arrest Movie Review: सहा महिने घराबाहेर न पडलेल्या तरुणाची भन्नाट गोष्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रीडा
Advertisement