LIVE UPDATE | शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सत्तास्थापनेसाठी जोरदार चर्चा सुरु, सूत्रांची माहिती

Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
सकाळच्या हेडलाईन्सवर एक नजर....
1. भाजपवर दबावतंत्र वापरणारी शिवसेना अचानक बॅकफूटवर, महायुतीत राहण्यातच भलं, मुख्यमंत्रिपदाची मागणी रेटून धरणाऱ्या संजय राऊतांचा सूर नरमला
2. मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून भाजपकडून देवेंद्र फडणवीसांची निवड तर राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदी अजित पवार, शिवसेनेची आज बैठक
3. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह 13 खाती देण्याची भाजपची तयारी, सूत्रांची माहिती, मुख्यमंत्रीपदासह गृह, अर्थ, महसूल, नगरविकास खातं भाजपकडेच
4. वीज अंगावर पडून राज्यभरात सात जणांचा मृत्यू तर अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कापूस, ज्वारी, द्राक्षबागांचं प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
5. आजपासून जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन नवे केंद्रशासित प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये गिरीश चंद्र मुर्मू तर, लडाखमध्ये आरके माथुर पहिल्या उपराज्यपालपदाची शपथ घेणार
6. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 144 व्या जयंतीनिमित्त आज देशभरात रन फॉर युनिटीचं आयोजन, देशभरातील 700 हून अधिक जिल्ह्यांतील लाखो लोक सहभागी होणार























